जामखेड प्रतिनिधी
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड ने कोरोना काळात सामाजिक काम करत अनेक निराधार लोकांना अन्न पुरवले व मदत केली. तसेच दिपावलीत धार्मिक ऐतिहासिक ठिकाणी मशाली पेटवून फटाक्यांच्या आतषबाजीने दिवाळी साजरी केली व संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी व इतिहास जिवंत ठेवण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान काम करत आहे.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित किल्ले बनवा स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ. भगवानराव मुरुमकर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, मनसे तालुकाध्यक्ष प्रदिप टाफरे, तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, दादा महाडिक, रावसाहेब नेटके, रोहिणी काशिद, राऊत मॅडम, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुराजे भोसले, मयुर भोसले सर, खंडागळे नाना, उद्धव हुलगुंडे, यासह मोठ्या संख्येने पालक व किल्ले बांधणारे विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की, लहान मुलांच्या चाणाक्ष बुद्धीला चालना देण्याचे काम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान करत आहे. किल्ले बनवा स्पर्धेमुळे मुलांना इतिहासाची माहिती मिळते. पांडूराजे भोसले म्हणाले की, या स्पर्धेमुळे लहान मुलांमध्ये इतीहासाची आवड निर्माण होऊन मुले किल्ला बनवतात त्यमुळे ते किल्ला बनवण्यासाठी किल्ल्याविषयी पुस्तके वाचून माहीती घेतात. व त्यांना हा देश व आपला धर्म टिकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज व असंख्य मावळ्यांनी निस्वार्थी फक्त आपल्यासाठी बलिदान दिलेसे आहे व त्यामुळेच आपला हा धर्म व आपला देश हिदुस्तान आज जिवंत आहे या खर्या इतीहासाची माहीती मिळते. मनसे प्रमुख प्रदिप टाफरे म्हणाले की, मोबाईलचा उपयोग माहितीचा खजिना म्हणून करा गेम खेळण्यात वेळ वाया घालवू नका.
किल्ले बनवा स्पर्धेत शेकडो मुलांनी सहभाग नोंदविला होता यात पहिल्या आठ नंबर मध्ये आलेल्या ओंकार काळे – जंजिरा, प्राची नेटके – प्रतापगड, ओम टाफरे – विजयदुर्ग, विक्रांत वाटाडे- सिंधुदुर्ग, सई पठाडे – शिवपट्टण, पृथ्वी राळेभात-जंजिरा, ओम गडदे – भुईकोट, शिवानी कोकाटे – सुवर्णदुर्ग, तसेच सर्व स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा देण्यात आली. यावेळी साई काळे, हिंगशे, अभिजित राळेभात, सोहम जगदाळे, अदित्य सुरवसे, समर्थ ठेंगणे, विठ्ठल वराट, बाळासाहेब काळे, श्रेयस वराट यांच्या सह अनेक स्पर्धक व पालक उपस्थित होते.






