जामखेड प्रतिनिधी

तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींच्या ४ रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे . जवळा , सावरगाव , नायगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांचे निधन झाल्याने व आघी येथील पद रिक्त राहिले आहे .या कारणांनी रिक्त असणाऱ्या पदांसाठी या पोटनिवडणुका होत आहेत.

दि ३० नोव्हेंबर पासून अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे. अर्ज भरण्याचा अंतिम दिवस ६ डिसेंबर आहे (दिनांक ४ आणि ५ डिसेंबर सुट्टीचे दिवस वगळून). ७ डिसेंबर रोजी छाननी , तर ९ डिसेंबर अर्ज माघारीचा दिवस व चिन्ह वाटप आहे . या जागांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान , तर २२ रोजी मतमोजणी होणार आहे . यामध्ये मौजे जवळा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वसाधारण जागा , तसेच सावरगाव प्रभाग १ मध्ये अनुसूचित जाती , नायगाव प्रभाग १ मधील सर्वसाधारण जागा, आघी येथील प्रभाग ३ मधील अनुसूचित जाती स्त्री , प्रभागातील रिक्त सदस्याची पोटनिवडणूक घेण्यात येणार असून यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठी निवडणूकीचे नियोजन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे . संबंधित गावापुरती आचारसंहिताही निकाल लागेपर्यंत लागू राहणार आहे अशी माहिती जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here