जामखेड प्रतिनिधी

गावातील तरूणांनी ज्ञानभैरव वाचनालयाच्या रूपाने जे रोपटे लावलेले आहे त्या रोपट्यामुळे गावातील विद्यार्थी भविष्यात उंच भरारी घेऊन उच्च पदस्थ अधिकारी होतील असा विश्वास सत्काराला उत्तर देताना सुदाम वराट यांनी सांगितले.

बालदिनानिमित्त गावातील ज्ञानभैरव वाचनालयातर्फे मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी यावेळी सरपंच हनुमंत उतेकर, भास्कर काळे, आबासाहेब वीर सर, केंद्रप्रमुख किसन वराट, राम निकम, एकनाथ चव्हाण, सुनिल कुमटकर सर, वसंत निंबाळकर, काळे, बाळू लटके, आप्पासाहेब निकम, मिनिनाथ लटके, आशाताई इंगोले, पंढरीनाथ चव्हाण, आबा इंगोले, गौतम काळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मराठी साहित्य प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पत्ररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सुदाम वराट, निर्वाण फाउंडेशन चा आंतरराष्ट्रीय सामाजिक स्तरावरील पुरस्कार मिळाल्याबद्दल धनराज पवार, सौरभ गाडे महाराष्ट्र केसरी निवड झाल्याबद्दल तसेच मुंबई पोलीसमध्ये भरती झालेला राहुल बनाते, भारतीय सैन्यात भरती झालेला गोकुळ लटके तसेच अभिषेक राम निकम इंफोसेस कंपनीत निवड झाल्याबद्दल, भाग्यश्री उतेकर अंगणवाडी सेविका म्हणून निवड, राधा झरकर यांचा सन्मान सन्मान केला आला.

यावेळी बोलताना सुदाम वराट म्हणाले की, वाचाल तर वाचाल या युक्तीप्रमाणे जीवनात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांना लहान वयात वाचनाची वाचनालयामुळे आवड लागते. यावेळी बोलताना धनराज पवार म्हणाले की, जीवनात गुरूच्या आशिर्वादाने मला सन्मान मिळाला आहे. या सत्कारामुळे अधिक चांगले काम करण्याचे बळ मिळेल असेही सांगितले. यावेळी बोलताना आबासाहेब वीर सर म्हणाले की, ज्ञानभैरव वाचनालयाचे चांगले सामाजिक उपक्रम सुरू आहेत. चांगले काम केले त्यांना शब्बासकी मिळणे आवश्यक आहे. कष्टाशिवाय फळ नाही. कष्ट महत्त्वाचे आहे. बालदिनानिमित्त सत्कार समारंभ समारंभ आयोजित करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here