जामखेड प्रतिनिधी

न्यायालयीन प्रक्रियेसाठी आम्ही योग्य सहकार्य करत आसतो. मात्र तंटे वाढविण्यापेक्षा ते लोकन्यायालयाच्या माध्यमातून कसे सोडवता येईल यासाठी प्रयत्न करा व पिढ्यानपिढ्या कोर्ट कचेरी मध्ये वेळ वाया घालवू नका असे मत जामखेड चे न्यायाधीश रजनीकांत जगताप यांनी व्यक्त केले.

जामखेड तालुका विधी सेवा समिती , वकील संघ ,सतरा महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी अहमदनगर-जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने 75 व्या स्वातंत्र्यदिन आझादी का अमृत महोत्सव उपक्रम निमित्त २ ऑक्टोबर गांधी जयंती ते 14 नोव्हेंबर बाल दिवस या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कायदेविषयक जनजागृती चा आजचा शेवट दिवस होता. या निमित्ताने एनसीसीच्या वतीने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जामखेड न्यायालयाचे न्यायाधीश श्री रजनीकांत जगताप साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे , वकील बारचे अध्यक्ष संग्राम पोले, प्राचार्य सोमनाथ उगले, प्राचार्य अविनाश फडके, प्राचार्य मडके बी के , प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपाध्यक्ष अॅड पी एन कात्रजकार, अॅड पाटील व्ही वाय, माजी सैनिक तालुका अध्यक्ष बजरंग डोके, एनसीसी ऑफिसर कॅप्टन-गौतम केळकर, अनिल देडे, मयूर भोसले, विधी वरिष्ठ लिपिक विनोद नाईकनवरे , दिपक बिडगर, पोलिस विभागेचे पो कॉ धनराज बिराजदार, अरुण पवार, सह जामखेड महाविद्यालय, ल.ना होशिंग विद्यालय व रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालयाचे एन सी सी छात्र उपस्थिती होते. बालदिना निमित्त मान्यवरांचे स्तकार बालकांच्या हस्ते करण्यात आले.

पुढे बोलताना न्यायाधीश म्हणाले की जामखेड तालुका विधी समितीच्या वतीने 2 ऑक्टोबर गांधी जयंती ते 14 नोव्हेंबर बाल दिवस या कालावधीत प्रत्येक दिवशी जामखेड तालुक्यातील विविध ठिकाणी कायदेविषयक उपक्रम घेण्यात आले, सर्व वकीलांनी खेडो पाड्यात विविध गावात जाऊन महिनाभर उपक्रम राबवून समाजाला कायद्याची माहिती दिली. सामान्य जनतेचे हित जपावे हा मुख्य उद्देश आहे. एनसीसी चे उपक्रम कौतुकास्पद आहेत असे मनोगत न्यायाधीश रजनिकांत जगताप यांनी व्यक्त केले.

कायदेविषयक जनजागृती कार्य केल्या बद्दल जामखेड वकील बार सर्व वकील , जामखेडचे सर्व दैनिक तालुका प्रतिनिधी पत्रकार यांचा सन्मान करण्यात आला. तसेच एनसीसी चे उल्लेखनीय कार्य बद्दल 17 महाराष्ट्र एनसीसी बटालियन चे जामखेड महाविद्यालय, रयतचे श्री नागेश विद्यालय व ल ना होशिंग विद्यालयाचा व एनसीसी युनिटच्या सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ऍड नागरगोजे एम एन, अनिल देडे,व आभार मयुर भोसले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here