जामखेड प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा या प्रमुख मागणीसाठी जामखेड एस टी अगाराच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एन दिवाळीत दुसर्‍यांदा बंद पुकारला आहे. या बंदला जामखेड येथील भाजप व मनसे च्या वतीने पाठींबा देण्यात आला. दिवाळीच्या सणा दिवशीच हा बंद पुकारला आसल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू झाले आहेत.

एस टी कर्मचाऱ्यांनी मागिल आठ दिवसांपुर्वी संपुर्ण महाराष्ट्रा बंद ची हाक दिली होती. त्या वेळी शासनाने काही मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र त्या मागण्यांवर एस टी कर्मचाऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी एस टी महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्याची प्रमुख मागणी आहे व ती मागणी मान्य झाली नसल्याने पुन्हा जामखेड अगाराच्या कर्मचाऱ्यांनी आज दि ४ रोजी पहाटे पासुन बंद पुकारला आहे. या बंदला भाजप व मनसे च्या वतीने पाठींबा देण्यात आला आहे.

भाजपच्या वतीने सकाळी जामखेड अगारास कुलुप ठोकण्यात आले होते. वेळी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष शरद कार्ले, शहरध्यक्ष बीबीशन धनवडे, सोमनाथ राळेभात, अभिजीत राळेभात, महेश मासाळ, मोहन मामा गडदे, प्रविण बोलभट, उद्धव हुलगुंडे, वैभव कार्ले, शिवकुमार डोंगरे उपस्थित होते. काही तासांनी सदर कुलुप पुन्हा उघडण्यात आले मात्र एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. पहाटे पासुन एक ही बस अगाराबाहेर पडली नसल्याने एन दिवाळी सणात प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. भाजप बरोबर मनसे देखील संप करणार्‍या कर्मचार्‍यांची भेट घेऊन भावना जाणुन घेतल्या व पाठींबा दिला. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, मनसे नेते हवा सरनोबत, सनी सदाफुले, नितीन सपकाळ, बीबीशन कदम, गणेश पवार, बालाजी भोसले, आकाश साठे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here