जामखेड प्रतिनिधी

स्थानिक राजकारणात शामीरभाई सय्यद काळानुसार प्रवाहाविरुद्ध चालले. मात्र आपल्या प्रभागातील नागरिकांशी प्रामाणिक राहून कामाचे वेगळेपण दाखवून दिले. जनसामान्यांच्या मनात आदराची जागा मिळवली. त्यांच्या कामात, बोलण्यात, वागण्यात कायम शिवसेना आहे म्हणून शामीरभाई सय्यद यांच्या पाठीशी यापुढेही शिवसेना पक्ष ठामपणे उभा राहील असे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी दिले.

जामखेड येथे नगरसेवक शामीरभाई सय्यद यांनी स्वखर्चाने प्रभाग क्रमांक सहा मध्ये “आदर्श उद्यान” बनवले त्याचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळयाला प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, नगरसेवक अमित चिंतामणी, जलीलभाई सय्यद, शेरखान पठाण भगवान कोकणे, शाकीर शेख तसेच उबाळे सर समिंदर सर, संदीप भोरे, बंडु अंदुरे, ढोबे सर, दहिकर साहेब, संपत चखाले, मेजर राजेंद्र काळे, सचिन शिंदे,अझहर खान,अफसर शेख, दत्तात्रय चरहाटे, नाजीम शेख, यासीर सय्यद, सादीक शेख, हामीद तांबोळी, ईस्माईल शेख, चांद तांबोळी आदींसह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाला महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
माता भगिनींना,वृद्धांना मनमोकळेपणाने बसण्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी प्रभाग सहामध्ये शामीरभाई सय्यद यांनी स्वखर्चाने व रामेश्वर सोसायटीच्या सहकार्यातुन उद्यान बनविले. त्याला “आदर्श उद्यान” नाव दिले आहे. जामखेडमध्ये अनेक दानशूर व्यक्ती आहेत. शामीरभाई एक सामान्य कुटुंबातील असुनही स्वखर्चाने आदर्श उद्यान बनवून आहे. प्रभागापुरता का होईना आगळावेगळा उपक्रमांद्वारे इतरांसमोर शामीरभाई यांनी आदर्श उभा केला आहे. याबद्दल पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड नगरसेवक अमित चिंतामणी आदींनी मनोगतातून शामीरभाई यांच्या कामाचे कौतुक केले.
यावेळ महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी तालुक्यातून आफताब शामीर सय्यद यांची ९२ कीलो वजनी गटात निवड झाली तसेच सैफ इस्माईल शेख ६१ कीलोमध्ये, तर मुन्ना असीर तांबोळी यांची ६२किलो कुमार चॅम्पीयनसाठी
निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सरसमकर सर तर आभार अझहर खान व शहाबाज सय्यद यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here