जामखेड प्रतिनिधी

पाडळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय शिक्षण सिमितीच्या अध्यक्ष पदी गणेश खैरे तर उपाध्यक्षपदी सौ सोनाली गणेश पवार यांची निवड करण्यात आली.

पाडळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय शिक्षण सिमितीच्या पदाधिकारी यांच्या निवडी नुकत्याच संपन्न झाल्या या निवडीमध्ये शालेय शिक्षण सिमितीच्या अध्यक्ष पदी गणेश खैरे यांची निवड झाली. तर उपअध्यक्ष पदी सौ. सोनाली गणेश पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत च्या वतीने अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शिक्षक पांडुरंग मोहळकर यांना जिल्हा परिषद चा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्या बद्दल देखील पाडळी गावचे सरपंच बाळासाहेब खैरे यांनी त्यांचा ग्रामपंचायत च्या वतीने सन्मान करण्यात आला.

या वेळी जेष्ठ नेते पंडीतराव पवार, उपसरपंच प्रकाश नाना पवार, माजी सरपंच शिवाजी दादासाहेब पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रविण खैरे, बाळासाहेब लांडगे, बजरंग पवार अमोल सकट कीरण पवार, शिवाजी पवार, शाळेच्या मुख्याध्यापिका कांबळे मॅडम उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here