जामखेड प्रतिनिधी

खर्डा येथील ग्रामदैवत कानिफनाथ टेकडी परिसरात महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जामखेड तालुका राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे तालुकाध्यक्ष तुळशीदास गोपाळघरे यांनी व्यक्त केले.

वृक्षारोपण कार्यक्रम दरम्यान सेवा सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत गोलेकर, दत्ता गोपाळघरे, ग्रा.पं सदस्य महालिंग कोरे, मिलनशेठ कांकरिया, प्रा.अमोल जायभाय, प्रगतशील शेतकरी दयानंद इंगवले,प्रा विशाल सौन, प्रा हनु कोरे,प्रा. आदिनाथ खेडकर, डॉ अशोक सोनटके, वैभव आंधळकर, वसंत पवार आदि सदस्य उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here