जामखेड प्रतिनिधी

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तालुकास्तरावर संत भगवान शासकीय वसतीगृह योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी व जामखेड या दोन्ही तालुक्याच्या ठीकाणी मुलांसाठी व मुलींसाठी प्रत्येकी दोन या प्रमाणे १०० क्षमतेची एकुण ४ शासकीय वसतीगृह मंजूर केलेली आहेत.

ऊसतोड कामगारांचे जीवन अस्थिर व हलाखीचे असून त्यांचे राहणीमान उंचावणे गरजेचे आहे. मात्र, या कामगारांच्या स्थलांतराच्या वेळी मुलांचे शिक्षणाचे हाल होतात व शाळेतील गळतीचे प्रमाणही वाढते. त्यामुळे अशा प्रकारे शासकीय वसतीगृह योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच अनुषंगाने जामखेड व पाथर्डी तालुक्यात दोन वसतिगृहे मंजुर झाली आहेत. या वसतिगृहासाठी नवीन इमारत भाडे तत्त्वावर घेण्यात येणार आहे. यासाठी शासनाने काही नियम लागु केले आहेत. या मध्ये सदरची इमारत ही शैक्षणिक संस्थांच्या मध्यवर्ती ठीकाणी असावी, इमारतीचे क्षेत्रफळ मोकळ्या जागेसह प्रति विद्यार्थी १०० चौरस फुटांपर्यंत या प्रमाणे या वसतीगृहासाठी दहा हजार चौरस फूटा पर्यंन्त इमारतीचे क्षेत्रफळ असावे, दहा विद्यार्थीन मागे एक स्नानगृहे व एक स्वच्छतागृह असावे, पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा व पथदिवे सह इतर सुविधा असाव्यात, इमारत मालकांना दरमहा अपेक्षित असलेले इमारत भाडे व मालमत्ता कर इत्यादी जे इमारत मालक उपरोक्त भाडे तत्त्वावर निकष पूर्ण करीत असतील अशा इमारत मालकांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, अभिविश्व कॉम्प्लेक्स, बोल्हेगाव फाटा, मनमाड रोड, अहमदनगर या कार्यालयाच्या ठीकाणी आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करावा. तसेच सहायक आयुक्त राधाकिसन देवढे अहमदनगर व जामखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहाचे अधिक्षक अनिल कीसन गर्जे यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here