

जामखेड तालुक्यात बिबट्याचा हल्ला; एक महीला गंभीर जखमी
जामखेड प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे घटनेचे गांभीर्य पाहता ताबडतोब अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालय दाखल झाले संमतीत महिलेची भेट घेऊन डॉक्टरांशी चर्चा करून नातेवाईकांना भेटले तिला अतिदक्षता रूम मध्ये ठेवण्यात आले आहे.
जामखेड तालुक्यातील उषा सौदागर चव्हाण (वय 45, ) राहणार खांडवी बावी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर यांच्यावर आज बिबट्याने अचानक हल्ला चढवून चावा घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. जखम खोल असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेनंतर उषा चव्हाण यांना तत्काळ जामखेड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे सध्या त्या सिव्हिलमध्ये दाखल असून उपचार सुरू आहेत.
जखमी महिलेस भेट देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून उपचारासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे, मुलांवर विशेष लक्ष ठेवावे आणि वनविभागाने योग्य उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही संजय कोठारी यांनी केले.
घटनेमुळे खांडवी बावी नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून तातडीने बिबट्याचा शोध घेऊन सुरक्षेची पावले उचलण्याची मागणी होत आहे.







