उमेदवार अनिल श्रीरामे यांचा भाजपात प्रवेश, प्रभाग 11 मध्ये मोठा उलटफेर

जामखेड प्रतिनिधी

जामखेड नगरपरिषद निवडणूकीत शनिवारी मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. प्रभाग अकरामधील उमेदवार अनिल मधुकर श्रीरामे यांनी भाजपात जाहीर प्रवेश करत मोठी खळबळ उडवून दिली. अनिल श्रीरामे यांनी भाजपच्या तिन्ही उमेदवारांना यावेळी जाहीर पाठींबा दिला. विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे प्रमुख उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे प्रभाग अकरामध्ये भाजपची ताकद वाढली आहे.

शनिवारी दुपारी विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग अकरा मधील उमेदवार अनिल मधुकर श्रीरामे यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. अनिल श्रीरामे हे २०२४च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते.

आता नगरपरिषद निवडणूकीत त्यांनी विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत भाजपात प्रवेश केला. निवडणूक प्रचार सुरु होण्या आधीच भाजपने सर्वच पातळ्यांवर आघाडी घेतल्याचेच यातून दिसत आहे. भाजपला वाढता पाठिंबा विरोधकांच्या बत्या गुल करणार ठरत असल्याची चर्चा जनतेत आहे.

या पक्ष प्रवेशावेळी भाजप शहर मंडलाध्यक्ष संजय काका काशिद, अमित चिंतामणी, डाॅ भगवान मुरुमकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, चेअरमन अशोक महारनवर, चेअरमन विशाल भैय्या भांडवलकर, सरपंच राजेंद्र ओमासे, सागर टकले, पप्पू काशिद सह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सभापती प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला यामुळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी, नगरसेवक पदाचे उमेदवार संजय काशिद व आशाबाई बापू टकले यांना मताधिक्याने निवडून आणणार असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here