
दिघोळ पंचायत समिती गणातील भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवार सौ. रुपालीताई सुरज रसाळ यांच्या उमेदवारीला गावागावातून उतपुर्त प्रतिसाद
रसाळ बंधूंचे वडीलांच्या जून्या मित्रांशी भेटीगाठी व चर्चा सुरू, राजकीय समीकरणे बदलणार
जामखेड प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या तशा गावागावात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. जामखेड तालुक्यातील दिघोळ पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीकडून भुमिपुत्र सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तरूण तडफदार नेतृत्व कै रामभाऊ रसाळ यांचे सुपुत्र सुरज रामभाऊ रसाळ यांच्या सौभाग्यवती रूपालीताई सुरज रसाळ या दिघोळ पंचायत समिती गणातून उमेदवारी करणाण्यास इच्छूक असुन त्यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे. रूपालीताई रसाळ यांच्या उमेदवारीने दिघोळ पंचायत समिती गणातून राजकीय समीकरणे बदलणार असल्याची संपूर्ण खर्डा जिल्हा परिषद गटासह दिघोळ गुणांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

दिघोळ पंचायत समिती गणाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षणीत झाले आहे या गणात जायभायवाडी, बांधखडक, तेलंगशी, धामणगाव, दिघोळ, माळेवाडी, मोहरी, जातेगाव, बाळगव्हाण, गुरेवाडी, महारूळी वाघा, आपटी, वाकी, पिंपळगाव उंडा या गावांचा समावेश आहे. सुरज रसाळ, धिरज रसाळ बंधूचा वरिल गाव वाड्या वस्तीवर लोकांशी संपर्क साधून चर्चा सुरू आहे. दिघोळ गावचे माजी सरपंच कै रामभाऊ रसाळ यांचे अनेक जुने मित्र व लाल मातीशी आसलेले आनेख मित्र व आज वेगवेगळ्या पक्षात संघटनात कार्यरत आहेत. कै रामभाऊ रसाळ यांचे पुत्र सुरज रसाळ व धिरज रसाळ हे आपल्या वडीलांच्या जुन्या मित्रांशी चर्चा करतात तेव्हा त्यांना कै रामभाऊ रसाळ या मित्राचे मूल म्हणून गावोगावी सहकार्य करणार असल्याचे त्यांच्याकडुन आश्वासन मिळत आहे. असे सुरज रसाळ यांनी सांगितले.
सूरज रसाळ यांच्या उमेदवारीने स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.
तंटामुक्ती अध्यक्ष पै धीरज रसाळ व यांनी दिघोळ माळेवाडी गाव व पंचक्रोशीत आबासाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले आहेत. शालेय मूलं, महिला, वृद्धासाठी सामाजिक उपक्रमांद्वारे मदत केली आहे. दिघोळ पंचायत समिती गणातून तरुण आणि ऊर्जावान कार्यकर्ते सुरज रसाळ यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीत ही सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या हिताचे काम करण्यासाठी लढायची आहे असे पै सुरज रसाळ यांनी सांगितले.







