

खांडवी येथील गाव भेटीत मंगेश (दादा) आजबेंच्या सामाजिक कार्याचा ग्रामस्थांनी केला गुण गौरव.
पै.चिराग आजबे व मंगेश आजबे यांच्या खांडवी गावभेटीला उत्पुर्त प्रतिसाद
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून संबोधले जाणारे मंगेश आजबे व साकत जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार पै.चिराग आजबे यांची गाव भेट व घोंगडी बैठक संपन्न झाली. यावेळी खांडवी येथील गाव भेटीत मंगेश (दादा) आजबेंच्या सामाजिक कार्याचा ग्रामस्थांनी केला गुण गौरव केला व त्यांच्या कामाचे कौतुक केले.

यावेळी ग्रामस्थांनी मंगेश दादा यांनी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेली आंदोलन आणी त्या माध्यमातुन कसा न्याय मिळाला याबाबत चर्चा झाली तसेच सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी दादा नेहमी कशी मदत करतात त्यामुळे अशा कार्यक्षम नेतृत्वाला आपण संधी दिली तर आपल्या आडचणी सोडवण्यासाठी त्यांना आणखी बळ मिळाले आशा भावना ग्रामस्थांनी बोलताना व्यक्त केल्या.
आणी हाच संदर्भ देत पै. चिराग आजबे म्हणाले की आज मी निवडणूकीच्या निमीत्ताने वडीलांन सोबत गावागावात जातो आहे आणी याच दरम्यान त्यांनी केलेले कार्य वडीलधारी मंडळी सांगतात यामुळे त्यांचा सर्व सामान्यांशी आसलेला संपर्क आणी माझ्या वडीलांबद्दल आसलेला आपलेपणा याचा मला सार्थ अभिमान आहे त्यांच्याच कार्यपद्धती मीही भविष्यात आपली सेवा करीत राहील असे बोलताना पै.चिराग आजबे यांनी सांगितले.

समारोपाच्या भाषणात बोलताना मंगेशदादा आजबे म्हणाले की शेतकरी हा आपला धर्म कोण कोणत्या पक्षाचा गटाचा आसा भेदभाव मी कधी केला नाही आणि तुमच्या पाठिंब्याच्या आधारावरच मी आनेक आंदोलने केली आणी ती यशस्वी करून दाखवली यातुनच आज तुम्ही माझं जे स्वागत केलं आणि प्रतिसाद दिला त्याने माझा ऊर भरून आला आसचं प्रेम व आशिर्वाद राहु ही आपेक्षा व्यक करतो आशी भावना व्यक्त केली.
गावकऱ्यांनी वाजत गाजत मंगेशदादा आजबे व पै. चिराग आजबे यांचे स्वागत केले यावेळी मोठ्या संख्येने खांडवी ग्रामस्थ उपस्थित होते.






