नागेश्वर मंदिरा जवळील पुल पुन्हा नव्याने तयार करण्यात यावा – सौ. सुरेखा सदाफुले.

अतिवृष्टीमुळे गेला होता पुल वाहुन

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरात मागिल महीन्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला होता. यामुळे नागेश्वर मंदिराजवळ नव्याने करण्यात आलेला पुल वाहुन गेला होता. परीणामी पोलीस स्टेशन परीसर व शहरातील नागरिकांना पुल नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे याठिकाणी नीधी उपलब्ध करुन मोठा सिमेंटचा पुल तयार करण्यात यावा अशी मागणी दिक्षा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुरेखा अनिल सदाफुले यांनी दोन्ही लोकप्रतिनिधीनकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जामखेड शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे शहरातील नागेश्वर मंदिरा जवळील नव्याने बसविण्यात आलेला लोखंडी पूल मागिल महीन्यात झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे नुकसान होऊन वाहुन गेला होता. यावेळी विरोधकांन कडुन आरोप प्रत्यारोप झाले होते. गेल्या एक महिन्यानंतर देखील अद्याप प्रशासनाने पुलाबाबत कसल्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे पोलीस स्टेशन भागातील नागरीक व शहरातील इतर नागरीकांना नदी ओलांडून मंदिरात दर्शनासाठी व पुढे खर्डा रोडकडे जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. नागेश्वर मंदिराकडे व खर्डा रोडकडे जाण्यासाठी नागरीकांना हा रस्ता अत्यंत जवळचा रस्ता आहे. लोखंडी पुल होता त्यावेळी पादचारी नागरीकांना देखील या पुलामुळे दिलासा मिळाला होता.

आता मात्र या पुलाकडे दोन्ही लोकप्रतिनिधींचे दुर्लभ होताना दिसत आहे. याबाबत दिक्षा प्रतिष्ठान च्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या सौ सुरेख अनिल सदाफुले यांनी दोन्ही लोकप्रतिनिधीना निवेदन देऊन लक्ष वेधुन घेतले आहे व याठिकाणी भक्कम असा सिमेंटचा पुल बांधण्यात यावा अशी मागणी केली आहे. नव्याने पुलाचे बांधकाम हे खर्डा रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याला जोडुन करण्यात यावा तसेच हा पुल भक्कम पद्धतीने केल्यास या पुलावरून चारचाकी व दुचाकी वहाने देखील जाऊ शकतात.

श्री क्षेत्र तुळजापूरकडे जाणारा देवीचा पलंग देखील या भागातुन नवरात्रीच्या दरम्यान जात आसतो परंतु याठिकाणी पुल नसल्याने व नदीला मोठा पुर आल्यामुळे दुसर्‍या मार्गाने जावे लागले. त्यामुळे तातडीने याठिकाणी पुढे खर्डा रोडला जोडणारा भक्कम पुल तातडीने नीधी उपलब्ध करुन तयार करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यां सौ. सुरेखा सदाफुले यांनी दोन्ही लोकप्रतिनिधीना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here