

पै. चिराग आजबे व मंगेश (दादा) आजबे यांच्या साकत जिल्हा परिषद गटातील राजेवाडी येथील शेतकऱ्यांच्या गावभेटीला उत्पुर्त प्रतिसाद
जामखेड प्रतिनिधी
जिल्हापरिषद साकत गटाचे इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पै. चिराग (भैय्या) आजबे व मंगेश (दादा) आजबे यांनी आपल्या गटातील गावभेटी दौरा सुरु केला आहे. यावेळी गावातील ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजुन घेतल्या व त्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील पै. चिराग आजबे यांनी सांगितले. यावेळी शेतकर्यांचा या गावभेटीला उत्पुर्त सुरवात झाली आहे.

जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवुन शेतकर्यांचे प्रश्न मार्गी लावणारे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मंगेश (दादा) आजबे हे आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी साकत जिल्हा परिषद गटातून इच्छुक आहेत. यासाठी मंगेश दादा आजबे व त्यांचे पुत्र पै. चाराग मंगेश आजबे यांनी गावभेटी दौरे सुरु केले आहेत. राजेवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी ग्रामस्थांचा अडी-अडचणी जाणुन घेतल्या.

यावेळी राजेवाडी येथील ग्रामस्थांनी मंगेश दादा आजबे व पै. चिराग आजबे यांचा सन्मान केला. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की कोरोना काळात राजेवाडी गावासाठी कोणीच धावुन आले नाही त्या ठिकाणी फक्त मंगेश दादा आजबे हे धाऊन आले. त्यांनी कोरोना काळात केलेली मदत विसरुन चालणार नाही. कोरोना बरोबरच गेल्या आनेक वर्षापासून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झटत आहेत व त्यांच्या अडी-अडचणी जाणुन घेत मार्गी लावत आहेत. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने राहुन पै. चिरग आजबे यांचे काम करायचे आसुन एकजुटीने चिराग आजबे यांचा प्रचार करायचा आहे.

यावेळी सत्काराला उत्तर देताना मंगेश दादा आजबे म्हणाले की मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे मला शेतकऱ्यांच्या व्यथा माहित आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत मी शेतकर्यांच्या प्रश्नावर झटत रहाणार आहे. सध्या निवडणूकीचे वारे वहात आहे. याच अनुषंगाने मी माझा मुलगा पै. चिराग आजबे यास साकत जिल्हा परिषद गटातून निवडणूकीच्या रींगणानात उतरवणार आहे. त्यामुळे मला तुमची साथ हवी आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पसा च्या माध्यमातून शेतकऱ्यांची लुट होत होती ती लुट आंदोलनाच्या माध्यमातून थांबवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे वर्षाला हजारो रुपये वाचले आहेत.







