

मे.सात्त्विक ज्वेलर्स हे दालन ग्राहकांच्या सेवा व विश्वासावर आधारित असेल – सभापती प्रा.राम शिंदे
मे. सात्त्विक ज्वेलर्स” या नवीन दालनाचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
जामखेड प्रतिनिधी
सुवर्ण अलंकार क्षेत्रातील नव्याने सुरू झालेल्या मे. सात्त्विक ज्वेलर्स म्हणजे स्थानिक व्यापारी वर्गाच्या प्रगतीचा नवा टप्पा आहे. त्यामुळे स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देत, मे. सात्त्विक ज्वेलर्स हे दालन ग्राहकांच्या विश्वास आणि सेवाभावावर आधारित असेल, असा विश्वास सभापती प्रा.राम शिंदे यांनी मे. सात्त्विक ज्वेलर्स या दालनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर, जामखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठ, मेन रोड या ठिकाणी बुधवार दि.२२ ऑक्टोंबर २०२५ रोजी सुरू झालेल्या “मे. सात्त्विक ज्वेलर्स” या नवीन दालनाचे उद्घाटन सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात, जामखेड नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती अमित भाऊ चिंतामणी, सभापती पै शरद कार्ले, जेष्ठ नेते अंकुश उगले, शहर अध्यक्ष संजय काशिद, माजी संचालक मनोज काका कुलकर्णी, प्रविण चोरडिया, नगरसेवक पवनराजे राळेभात, सा संचालक पोपट नाना राळेभात, जमीरभाई सय्यद, नगरसेवक अमित जाधव, दुकानाचे संचालक कैलास वसंतराव पंडीत, संतोष वसंतराव पंडीत, सुरज कैलास पंडित, सार्थक संतोष पंडित, यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
मे. सात्त्विक ज्वेलर्स च्या उद्घाटनप्रसंगी नगरसेवक अमित भाऊ चिंतामणी म्हणाले की जामखेड शहरातील बाजारपेठेत एक सोन्याचे दालन सुरू होत असून हे शहरात वैभव टाकणारे दालन असेल. तसेच लवकच ग्राहकांना या दालनाच्या माध्यमातून सेवा मिळेल. पंडित कुटुंबियांनी नविन दालन सुरू करण्याचा घेतलेला निर्णय महत्वाचा आहे असे मत नगरसेवक अमित चिंतामणी यांनी व्यक्त केले.






