


आम आदमी पार्टी निवडणुका स्वबळावर लढविणार, जामखेड नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील आम आदमी पार्टी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर निवडणूक लढविणार आसल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच जामखेड नगरपरिषद निवडणूकीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील जाहीर केला असून नगरसेवक पदासाठी देखील 12 प्रभागात 24 उमेदवार निवडणूकीच्या रींगणानात उतरवणार आसल्याची माहिती दिली.

जामखेड येथे बुधवार दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी आम आदमी पार्टी जामखेड पक्षाची पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी यावेळी तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा, ॲड. बिपिन वारे, सागर मोरे, ॲड जैद सय्यद, संजय सदाफुले, विकास पवार, अब्दुल शेख, नाजिम पठाण, अरफान शेख, अरबाज सय्यद, सलिम शेख, अजय भोसले, दिपक शेळके, अतुल खराडे, सुंदर परदेशी, गोकुळ परदेशी, बजरंग सरडे, जुबेर काझी, ऋषीकेश लांडगे, स्वप्नील वारे, सकलेन पठाण यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा यांनी सांगितले की, राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजित फाटके पाटील, जिल्हा अध्यक्ष राजू आघाव यांच्या आदेशानुसार आज आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करत आहेत. आणि पक्षाच्या आदेशानुसार आम्ही अल्पसंख्याक चेहऱ्याला संधी देत आहोत. तसेच लवकरच नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करण्यात येतील असेही सांगितले.
आम्ही समविचारी पक्षांना बरोबर घेऊन संपूर्ण ताकतीने ही निवडणूक लढवणार आहोत. आतापर्यंत इतर पक्षांनी आमचा वापर फक्त मतापुरताच केला आहे. आता असे होणार नाही. आम्ही ताकतीने निवडणूकीला सामोरे जाणार आहोत. जामखेड शहरात सध्या खुपच समस्या आहेत. रखडलेले रस्ते, शहरात मोकाट कुत्रे जनावरे, कचरा समस्या घाणीचे साम्राज्य, नागरिकांना होणारा त्रास यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही निवडणूका लढविणार आहोत असे सांगितले.








