नगराध्यक्ष पदाचे अरक्षण जाहीर, जामखेड नगरपरिषदेवर येणार महीला राज

जामखेड प्रतिनिधी

संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या आरक्षणाची सोडत सोमवारी दि 6 रोजी दुपारी जाहीर झाली. जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महीलांसाठी आरक्षीत झाले आहे. त्यामुळे सत्ता कोणाचीही असली तरी जामखेड नगरपरिषदेवर महीलाराज येणार. आता नगरसेवक पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतीं मधील नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार 33 नगरपरिषदांपैकी 17 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे. दरम्यान जामखेड नगरपरिषदेचे आरक्षण कोणाला सुटणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. आज सोमवार दि 6 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी आरक्षण सोडत झाल्यानंतर पुरुष इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. कारण जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद खुल्या महीलांसाठी आरक्षीत झाले आहे. त्यामुळे आता इच्छुकांनी आपल्या अर्धांगिणीला निवडणूकीच्या रींगणानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.

यापुर्वी जामखेड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता जामखेड ग्रामपंचायत बरखास्त झाल्या नंतर 11 जुन 2015 रोजी जामखेड नगरपरिषदेची स्थापना झाली. यानंतर जानेवारी 2016 मध्ये निवडणूक होऊन प्रथम नगराध्यक्षाचा मान प्रिती विकास राळेभात, अर्चनाताई सोमनाथ राळेभात व निखिल घायतडक यांनी भुषविला होता. आता चौथ्या वेळी जनतेतून महिला उमेदवार नगराध्यक्षा पदी विराजमान होणार आहेत. जामखेड नगरपरिषदेचे जनतेतुन नगराध्यक्षपद पद खुल्या महिलांसाठी सुटल्या मुळे याठिकाणी चांगलीच चुरस पहावयास मिळणार आहे. आता नगराध्यक्ष पदाचे अरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष नगरसेवक पदाच्या अरक्षणाकडे लागले आहे. आनेक इच्छुक नगरसेवक निवडणूकीच्या रींगणानात उतरणार आहेत मात्र जोपर्यंत नगरसेवक पदाचे अरक्षण जाहीर होत नाही तो पर्यंत सर्वांनीच आपली तलवार म्यान करुन ठेवली आहे आसे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळी नंतर घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर निवडणूक पूर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात येत्या 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान नगरपरिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे. तसेच 15 ते 20 डिसेंबरदरम्यान जिल्हा परिषद निवडणुका होऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here