आदर्श शिक्षक गोकुळ गायकवाड यांच्या मुलाचा आपघाती मृत्यू, डॉक्टर होणाऱ्या तरुणावर काळाची झेप

जामखेड प्रतिनिधी

आदर्श शिक्षक, तसेच प्राथमिक शिक्षक बँकेच्या विकास मंडळाचे माजी विश्वस्त गोकुळ गायकवाड सर जामखेड यांचा धाकटा मुलगा अविष्कार (सोनू) गोकुळ गायकवाड यांचा इस्लामपूर येथे अपघाताने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मोटारसायकल वरून जात असतांना समोर रस्त्यावर काही तरी आडवे आले आणि त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात मोटारसायकल रस्ता दुभाजकावर आदळुन मोठा अपघात झाला. अविष्कार गायकवाड हा शिक्षणासाठी इस्लामपूर जि. सांगली येथे होता. त्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदवीचे शेवटचे केवळ ६ महिने राहिले असतांनाच काळाने त्याच्यावर झडप घातली. अपघातात अविस्कार गायकवाड यांचा मृत्यू झाला. ही घटना गायकवाड कूटुंबियांसह जामखेड करांसाठी धक्कादायक आहे.


गायकवाड सरांनी दोन्ही मुलांना अत्यंत कष्टाने, जिद्दीने शिकवले हा छोटा मुलगा सोनू लहान पणापासून अत्यंत चाणाक्ष, हुशार राहिलेला होता. मयत अविस्कारच्या अकाली जाण्याने गोकुळ गायकवाड सरांची केवळ वैयक्तिक हानीच झाली नाही तर समाजाचेही कधीही भरून न येणारे अपरिमित नुकसान झाले आहे. या. दुर्दैवी घटनेने गायकवाड कुंटुंबावर फार मोठा आघात झाला आहे. या घटनेतून गोकुळ गायकवाड व परिवाराला सावरण्याची शक्ती ईश्वराने द्यावी हि ईश्वर चरणी प्रार्थना करत आहेत. अविस्कार गोकुळ गायकवाड यांचा पार्थीव जामखेड आणण्यात येत आहे. त्यांचा अत्यंविधी सायंकाळी ५ वा. अमरधाम जामखेड येथे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here