जामखेडमध्ये महादौड व हिंदु दसरा मेळावा उत्साहात संपन्न. रावण दहन करून महादौडीने दसरा मेळाव्याचा समारोप

जामखेड प्रतिनिधी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेडच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी दुर्गामाता महादौड व हिंदू दसरा मेळावा मोठ्या उत्सवात पार पडला यामध्ये हजारोंच्या संख्येने जामखेडकर सहभागी झाले. घटस्थापना ते विजयादशमी या कालावधीत पहाटे ५-३० वा छत्रपती श्री शिवाजी महाराज पेठ, शनि चौक, येथुन शेकडो शिवप्रेमी दौडत लोहार देवी येथे जाऊन महाआरती करुन दर्शन घेतात.

यावर्षी पहाटे पावसात सुद्धा दौड सुरू होती. रोज नित्यनियमाने तरुण दौडीत सहभागी झाले. याचे जामखेडकरांनी कौतुक केले. घटस्थापना ते विजयादशमी या कालावधीत पहाटे ५-३० वा श्री शिवाजी महाराज पेठ शनि चौक येथुन शेकडो शिवप्रेमी दौडत लोहार देवी येथे जाउन महाआरती करुन दर्शन घेतात.

विजयादशमी च्या दिवशी बाजारतळ दुर्गामाता मंदीर येथुन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दौड निघाली. यामध्ये शस्त्र पथक भगवे फेटे घालून पारंपारिक वेशात तरुण सहभागी झाले व ठीक ठिकाणी जामखेडकरांनी दौड ध्वजाचे पूजन केले, लोहार देवी येथे शस्त्र पूजन करून लाठीकाठी, तलवार, भाला, पाश विटा याचे युध्द कलेचे चित्त थरारक प्रात्यक्षिक दाखवले. तसेच मुलींच्या रोप मल्लखांब चे चित्त थरारक प्रात्यक्षिकाने जामखेडकरांची मने जिंकली. शेवटी महाआरती करून रावण दहन करण्यात आला.

यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे पांडुराजे भोसले यांनी येणाऱ्या गडकोट मोहीमेत हजारोंच्या संख्येने शिवप्रेमींनी सहभागी व्हावे या वर्षी लोहगड भीमगड ते राजमाची असा मोहिमेचा मार्ग आहे. देव, देश व धर्माचे भारतीय संस्कृतीचे संरक्षण व्हावे यासाठीच गडकोट किल्ले मोहीम संभाजीराव भिडे गुरुजींनी चालु केली आहे. जामखेडमध्ये रस्त्याचे काम झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे काम चालू करणार आहोत. जामखेडचा हिंदू दसरा मेळावा म्हणून आपण सर्व एकत्र येत आहोत.

अतिवृष्टी मध्ये जामखेडकरांनी केलेली मदत आम्ही सर्वत्र पोहोच केली आहे. संकटाच्या काळात आम्ही सदैव मदतीला तयार आहोत. असंख्य आमच्या जाती परी संकटामध्ये विरघळून जाती या वृत्तीने आम्ही कार्य करत आहोत. भारतीय सैन्य आपल्या जीवाची बाजी लावून देशाचे रक्षण करतात त्यांना आपण आपल्या कार्यातून मानवंदना दिली पाहिजे. असे मनोगत व्यक्त केले. दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे आकर्षक सजावट कऱण्यात आली. शिवरायांचे आठवावे रूप घेऊन शेवटी रावण दहन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here