


सीना नदीच्या पुलाशेजारी रस्ता वाहुन गेल्याने पडले मोठे भगदाड, जामखेड- करमाळा वहातुक बंद
जामखेड प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला आहे. त्यामुळे सीना नदीवरील जवळा-आळजापुर – करमाळा या रस्त्यावरील पुलाशेजारी रस्ता वाहुन गेल्याने मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे जामखेड-करमाळा रस्त्यांवरील वहातुक पुर्णपणे बंद झाली आहे. हा रस्ता दुरुस्ती करण्याचे काम सुरू आसुन सध्यातरी या रस्त्यावरील वहातुक बंद आहे.

जामखेड तालुक्यात मागिल तीन दिवसांपासुन पडत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात शेतीचे तसेच पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक जनावरे देखील मुत्यूमुखी पडले आहेत. तसेच पिंपळ गाव उंडा येथे एका वृद्ध महीलेच्या अंगावर भींत पडुन मृत्यू झाला तर सावरगाव येथे भींत पडुन तीन जण जखमी झाले होते. अनेकांच्या घरात पाणी शिरले असल्याने जिवनावश्याक वस्तुंचे देखील नुकसान झाले आहे. प्रशासनाकडु याबाबत पंचनामे सुरू आहेत.
सीना आणि तिच्या उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे रविवारी पुन्हा एकदा पुन्हा एकदा सीना नदीला महापुर आला. जवळा परीसरात सीना नदीने रौद्र रूप धारण केले होते. इतिहास प्रथमच १९७२ साली बांधलेल्या पुलावरुन प्रथमच पाणी वाहीले असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. रविवारी दुपारी चार वाजल्यापासून पुलावरुन पाणी वाहु लागले होते. सीना नदीवरील जवळा-आळजापुर – करमाळा या रस्त्यावरील पुलाशेजारी रस्ता वाहुन गेल्याने मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे जामखेड- करमाळा रस्त्यांवरील वहातुक पुर्णपणे बंद झाली आहे.

शिल्पसृष्टीला पुराचा वेढा; शिंदे यांच्या घरालाही पाणी
सीना नदीच्या पुरामुळे चौंडी गावाला देखील पुराचा वेढा पड़ला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या बंगल्या भोवती गुडघाभर पाणीसाचले होते. शाळा, दुकाने, तलाठी कार्यालय, हेलीपेड परिसर, विश्रामगृह, शिल्पसृष्टी गाईन या सर्व भागांत पाणी शिरले. चौंडी येथे पुर ग्रस्तांना मदतकार्य करण्यासाठी आ. रोहीत पवार हे देखील दाखल झाले होते. देवकरवाड़ी पूर्णतः जलमयझाली असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मोहीम सुरू आहे. गावात ठिकठिकाणी बोटीद्वार मदतकार्यसुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. चोंडीला पाण्याचा वेढा पड़ला होता. गेल्या १५ दिवसांत हा तिसरा महापूर आहे. नदीवरील बंधारे उद्ध्वस्त झाले आहेत.








