

अतिवृष्टी झालेली असताना प्रशासकीय कर्मचाऱ्यांची कामात हलगर्जी व वेळेबाबत होणारी चूक दुरूस्त करावी – संतोष सुरवसे
जामखेड प्रतिनिधी
अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेले असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे शासन दरबारी कामे वाढत आहेत. त्यातच लोकसेवक असलेले कर्मचारी वर्ग कामावर हजर राहून जनतेचे काम वेळेत पूर्ण व्हावे म्हणून निवेदन देण्यात आले, कर्मचारी हे वेळेत हजर राहत नसून त्यांनी वेळेत हजर राहुन नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावेत अशी मागणी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने जामखेड तहसीलदार यांना सोमवार दि २९ रोजी निवेदन देण्यात आले, अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेले असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे शासन दरबारी कामे वाढत आहेत. त्यातच लोकसेवक असलेले कर्मचारी वर्ग कामावर हजर राहून जनतेचे काम वेळेत पूर्ण व्हावे म्हणून निवेदन देण्यात आले, कर्मचारी हे वेळेत हजर राहत नसून शासनाचा जी आर असताना सकाळी ९:४५ ते ६:४५ पर्यंत असून लोकसेवक कर्मचारी ते स्वतःच्या सोयीनुसार व मनमानीपणे कार्यालयात येताना दिसत आहेत, कर्मचारी वर्गाची हजरी ही बायोमेट्रिक अथवा फेश रीडिंग ने घेण्यात यावी, तसेच बरेच कर्मचारी कामावर असताना आपले ओळखपत्र गळ्यात अथवा जवळ ठेवत नाहीत. त्याने सर्वसामान्यांना जनतेला शासकीय कर्मचारी ओळखण्यास व समजण्यात सर्व सामान्य नागरिकांची दिशाभूल अडचण निर्माण होते, कर्मचारी हा स्वतःच्या अथवा शासकीय कामानिमित्त बाहेर जाताना त्याची हालचाल रजिस्टर मध्ये नोंद करण्यात यावी अशी अपेक्षा आहे. आपल्या कार्यालयाचा कारभार पारदर्शक गतिमान जबाबदारपणे प्रशासनाने करावा अशी विनंती करण्यात आली. यावेळी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जामखेड तालुका अध्यक्ष संतोष सुरवसे तसेच तालुका उपाध्यक्ष सागर जायभाय आदी उपस्थित राहून निवेदन देण्यात आले.







