

मुसळधार पावसामुळे सावरगाव येथे घर कोसळुन एकाच कुटुंबातील तीन जण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक
जामखेड प्रतिनिधी
जामखेड परिसरात गेल्या पाच दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. विशेषतः नदीकाठच्या लोकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. पिके पाण्यात गेलेली आहेत त्यामुळे तालुक्यातील नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे. यातच सावरगाव येथे पावसामुळे एक घर पडले असून घरात झोपलेले तीन जन जखमी झाले आहेत यातील एक जणांची प्रकृती गंभीर आहे.

जामखेड तालुक्यातील सावरगाव येथे गौतम बाबासाहेब गोरे हे रात्री आपल्या घरात कुटुंबासमवेत झोपलेले असताना रात्री साडेचार वाजता घर कोसळले यात स्वत: पत्नी व मुलगा तीघे जखमी झाले आहेत गौतम गौरे यांना जास्त मार लागला आहे. ते गंभीर जखमी झाले आहेत.
सावरगाव येथे गौतम बाबासाहेब गोरे (वय ४०), पत्नी सोनाली गौतम गोरे (वय ३५) व मुलगा सार्थक गौतम गोरे १४ हे घरात झोपलेले असताना पहाटे साडेचार च्या सुमारास अचानक झोपेतच अंगावर घर कोसळले यात तीघे जण जखमी झाले यातील गौतम गोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. तिघांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवले आहे.

घर कोसळले तेव्हा मोठा आवाज झाला हे ऐकून ताबडतोब आसपासचे लोक जमा झाले यांनी ताबडतोब जखमींना ढिगाऱ्याबाहेर काढले. व नगरला उपचारासाठी पाठवले घटनेची माहिती पोलीस पाटील तुषार चव्हाण पाटील यांनी तहसीलदार, सर्कल, तलाठी, ग्रामसेवक यांना दिली शासकीय यंत्रणेने घटनेचा पंचनामा केला आहे.
याचबरोबर जामखेड तालुक्यातील जातेगाव दिघोळ वंजारवाडी धनेगाव याठिकाणी देखील घरांची पडझड झाली आहे. तसेच शेतात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी ग्रामस्थ व शेतकर्यांनी केली आहे. या परीसरातील भागिची पहाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मंगेश दादा आजबे यांनी केली आहे.







