धनेगाव परीसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या चौघांना काढले सुरक्षित बाहेर

धनेगाव परीसरातील पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यात रविवार रात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जामखेड शहरासह तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. याचा फटका तालुक्यातील धनेगाव येथील शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धनेगाव खर नदिच्या काठावर अडकलेल्या बाळासाहेब ढाळे यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींना प्रशासन व धनेगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीने पुराच्या पाण्यातुन बाहेर काढले. तसेच तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावेत अन्यथा शेतकऱ्यांन समवेत आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मंगेश (दादा) आजबे यांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी रात्री जामखेड तालुक्यातील धनेगाव, खर्डा जातगाव व दिघोळ सह अनेक गावात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे खैरी तलावात मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने धनेगाव परीसरातील खर नदीला पुर आला. या नदीकाठी आसलेल्या बाळासाहेब ढाळे कुटुंबातील रंगनाथ ढाळे वय 68, बाबुराव बाळासाहेब ढाळे वय 21, मंगल बाळासाहेब ढाळे वय 45 वर्षे, व बाळासाहेब ढाळे वय 53, असे एकाच कुटुंबातील चार जण अडकले होते. त्यांच्या घराला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास नदीच्या पुराने वेढा घातला व हे कुटुंब रात्रभर पाण्यात आडकुन पडले. रात्रभर ढाळे कुटुंब हे जागेच होते. तसेच घरात देखील पुराचे पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणावर जिवनाअश्यक वस्तुंचे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच धनेगाव येथील ग्रामस्थ घटनास्थळी धावत आले. तसेच प्रशासनाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मंगेश (दादा) आजबे यांनी देखील भेट दिली. घटनास्थळी एनडीआरएफ ची टीम देखील दाखल होणार होती मात्र तो पर्यंत नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने ग्रामस्थांनी स्वतः नदीत उतरुन ढाळे कुटुंबातील चार जणांना व जणांवरांना वाचविण्यात यश आले. तसेच धनेगाव परीसरातील नदीकाठच्या शेतीचे व पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मंगेश (दादा) आजबे यांनी धनेगाव येथील शेतकर्‍यांना धीर देत धनेगाव सह जातेगाव व दिघोळ परीसरातील झालेल्या घरांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी तातडीने पंचनामे करण्यात यावेत तसेच प्रशासनाने हलगर्जीपणा केला आथवा सरसकट पंचनामे केले नाही तर तालुक्यातील शेतकऱ्यांन समवेत मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा मंगेश (दादा) आजबे यांनी दिला आहे.

यावेळी घटनास्थळी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, राष्ट्रवादीचे युवा नेते मंगेश (दादा) आजबे, ग्रामस्थ कैलास जाधव, विजय भोरे, शाखा अभियंता गणेश काळे, सुजित गोडगे, तलाठी विकास मोराळे सर्कल नंदकुमार गव्हाणे, पोलीस कॉन्स्टेबल बिराजदार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश बडे सह धनेगाव येथील ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here