विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांची भूमिका निर्णायक – अनंता खेत्रे
श्री गणेश कोचिंगचा उपक्रम ठरला लक्षवेधी; गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न
जामखेड प्रतिनिधी
जामखेड प्रतिनिधी: जामखेड येथे श्री गणेश कोचिंग क्लासेसतर्फे आयोजित एन.एम.एम.एस /मंथन राज्यस्तरीय परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या भव्य सत्कार समारंभाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. रविवारी (दि. ५ एप्रिल २०२६) सकाळी १० वाजता समर्थ हॉस्पिटल मागे, दत्तनगर, बीड रोड येथे हा सोहळा मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य अनंता खेत्रे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य रमेश अडसूळ आदी मान्यवर, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी प्राचार्य अनंता खेत्रे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कष्ट करण्याची जिद्द, चिकाटी आणि मोठं काहीतरी साध्य करण्याची ताकद दडलेली असते. मात्र त्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळाली, तरच यशाचा मार्ग सुकर होतो. ही योग्य दिशा देण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करत असतात. शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देऊन त्यांना योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात.
माजी प्राचार्य रमेश अडसूळ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित न करता सातत्य, शिस्त आणि आत्मविश्वास यांचा अंगीकार करणे गरजेचे आहे. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमासोबत योग्य मार्गदर्शनही तितकेच महत्त्वाचे आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती वाढून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळते.
यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालक व शिक्षकांनी समाधान व्यक्त करत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन प्रा. गणेश खटावकर सर (संचालक, श्री गणेश कोचिंग क्लासेस) यांनी केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे संस्थेचे नाव उंचावले असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चि. प्रणव वारे व चि. पार्थ राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन चि. यशराज वराट यांनी केले.
प्रमुख यशस्वी विद्यार्थी: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती NMMS परीक्षा 2025- 26 मध्ये यश प्राप्त विद्यार्थी. चि. यशराज शहादेव वराट 145
चि. संग्राम प्रमोद ढाळे 127
चि. करण हनुमंत तिवारी 124
कु. श्रेया मारुती सुळे 119
चि. प्रणव अशोक वारे 117
चि. शिवराज अशोक लटके 115
कु. दूर्वा चंद्रकांत भुजबळ 112
कु. तन्वी योगेश राऊत 107
चि. राजवीर श्रीकांत काळे 106
कु. सृष्टी नागेश कात्रजकर 100
कु. पूजा राजेंद्र राऊत 98
कु. श्रीशा सुरेश शिंदे 95
चि. सुरज सुभाष जाधव 90
चि. संस्कार अमोल काळे 87
कु. वैष्णवी मच्छिंद्र वाघमारे 86
चि. पुष्कर संतोष तवटे 78
चि. मल्हारी औदुंबर उबाळे 56
प्रमुख यशस्वी विद्यार्थी मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा तसेच NMMS परीक्षेत उत्कृष्ट गुण प्राप्त विद्यार्थी
कु. उत्कर्ष पारखे (इ.5वी – 294/300), कु. ज्ञानेश्वरी पोटरे (288/300), कु. आर्या गायकवाड (280/300), चि. आरुष पारखे (इ.3री – 292/300), कु. राजनंदिनी गायकवाड (272/300), चि. श्रेयस सुळे (इ.4थी – 248/300), चि. महारुद्र बेद्रे (240/300), कु. शितल मौर्या (222/300), चि. प्रणव गुळवे (218/300), चि. यशराज वराट (इ.8वी – 202/300).
इतर यशस्वी विद्यार्थी:
चि. ईश्वर लगड, कु. प्रांजल झांबरे, कु. वैष्णवी पोटरे, कु. रेणुका डोके, चि. रुद्र खटावकर, चि. शौर्य भवर, चि. स्वरूप थोरात, चि. प्रणव साठे, चि. जान्हवी समुद्र, चि. ऋषिकेश बहिर, चि. संघर्ष पठाडे, कु. सुकन्या बडे, चि. रुद्र मोरे, चि. साई गायकवाड, चि. शौर्य आगलावे, चि. यश मिसाळ, चि. आदर्श कुलकर्णी, कु. श्रावणी मराळ, चि. शुभम पवार.





