

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित शांतता समिती बैठक संपन्न
जामखेड प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणे म्हणजे त्यांनी भारतातील नागरिकांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेले हक्क अधिकार व केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उत्सव आहे. त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जामखेड शहरात ठिकठिकाणी होणाऱ्या सकाळच्या अभिवादन कार्यकमाला उपस्थित ठेवावी. तसेच समाज बांधवांनी मिरवणूक व इतर कार्यक्रमात शांतता व सुव्यवस्था ठेवावी असे आवाहन जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी १४ एप्रिल रोजी होत असलेल्या कार्यक्रम व इतर दिवशी होणाऱ्या कार्यक्रमांच्या अनुषंगाने जामखेड शहर व हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने करण्यात येणाऱ्या उपाययोजना व सुचना देण्यासाठी
काल दि ३ एप्रिल रोजी सायंकाळी ६:०० वाजताचे दरम्यान जामखेड पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटी मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण लोखंडे, तहसीलदार धनंजय बांगर, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते नगरसेवक ॲड. डाॅ. अरुण जाधव, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, प्रा. कैलास माने, नगरसेवक प्रा. विकी घायतडक, सुनील जावळे, स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण होळकर, नगरपरिषद पाणीपुरवठा समिती सभापती श्रीराम डोके, पवन राळेभात, सुनील जावळे, संध्या सोनवणे, नगरपरिषदेचे इंजिनियर शेख, ॲड. बाळासाहेब घोडेस्वार, शांतता कमिटी सदस्य, राजकीय, सामाजिक, संघटना पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, मिरवणूक मंडळ अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण लोखंडे म्हणाले की. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव साजरा करत असताना कार्यकर्ते व पोलीस विभाग यांचा कायदा सुव्यवस्था याबाबत संवाद असणे आवश्यक, शहरासह ग्रामीण भागातील मंडळानीही मिरवणूका काढताना पुर्व परवानगी घेणे गरजेचे आहे. जामखेड शहरात जयंतीनिमित्त उभारण्यात येणारा नगर परिषदचा एकच स्वागत कक्ष असवा दुसरा असू नये. फायर ब्रिगेड, डायल १०८ ची रूग्णवाहिकेतून, मिरवणुक मार्गावरील विजेचे पोल, विठ्ठल मंदीरासमोरील विजेचा पोल, लोंबकळलेल्या तारा व्यवस्थित कराव्यात, वाहतूक व्यवस्थेस येणारे अडथळे, हातगाडे, दुकानांसमोरील साहित्य. गाड्या पार्किंग याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने आनंद व उत्सवात साजरी करण्यासाठी सर्वानी समन्वयाने काम करावे. असेही आवाहन यावेळी लोखंडे यांनी केले.

यावेळी ॲड.डॉ. अरूण जाधव म्हणाले की, पोलीस विभाग महावितरण व नगर परिषद यांनी विशेष दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. सामाजिक कार्यकर्ते विकिभाऊ सदाफुले यांनी जामखेड शहरात जयंती शांततेत व सुरळीत रित्या संपन्न होण्यासाठी सर्व समाजबांधवांनी दक्षता घ्यावी असे आवाहन केले. यावेळी तहसीलदार धनंजय बांगर म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीनिमित्त उत्सव साजरा करताना कायदा सुव्यवस्था राखावी, ध्वनी प्रदुषणाचे नियम पाळावेत, वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावा. वेळेचे काटेकोर नियोजन करावे.

दरम्यानजयंती मार्गावरील ट्रॅफिक नियोजन नियंत्रीत करण्यासाठी मुख्य पेठेत बॅरीकेट लावावेत. दुकानासमोर लावलेले छत व साहित्य उचलण्याच्या सुचना द्याव्यात. दि. १७ रोजी होणाऱ्या शिव-शाहू-फुले जयंतीच्या दिवशी पार्किंग, पाणी महिला शौचालयाची व्यवस्था करावी. मिरवणुक मार्गावरील खड्डे बुजवावेत व रस्ता दुरुस्ती करावी विठ्ठल मंदिरासमोरील पोल बाजूला हटवावा. अश्या अनेक मागण्या यावेळी विविध मान्यवरांकडून करण्यात आल्या. यावेळी प्रा. कैलास माने, प्रा. विकी घायतडक, सुनिल जावळे,
संध्या सोनवणे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी आभार व्यक्त करताना पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फ्लेस बोर्ड लावताना नगर परिषदेची परवानगी घ्यावी. व त्याचा क्रमांक फ्लेसवर टाकावा. डिजे बंदी आहे. नियममांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.
शेवटी मोठ्या उत्साहात व खेळीमेळीचे वातावरणात शांतता समितीची बैठक संपन्न झाली.



