हरवलेले सव्वालाखांचे मोबाईल मिळवुन दिले मुळ मालकास, जामखेड पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील सात मोबाईल धारकांचे मोबाईल विविध ठीकाणा वरुन हरवलेले होते. याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला मोबाईल हरवल्याच्या तक्रारी दाखल होत्या. याप्रकरणी पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी व त्यांच्या पथकाने या मोबाईलचा तपास करीत १ लाख २८ हजार ५०० रुपयांचे मोबाईलचा तपास करुन मुळ मालकांना ते मोबाईल सापडून दिले. यामुळे जामखेड पोलीसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांकडून मिळाले माहिती अशी की मोबाईलचे मालक सुरज मानिक पवार, रा. कान्होपात्रागल्ली जामखेड, ता.जामखेड, कृष्णा शहाजी बोराटे, रा. बोराटेवस्ती, जामखेड, अशोक सखाराम मैंदड, रा.अहिल्यानगरवस्ती जामखेड, नवनाथ विलास बिरंगळ, रा. सोनेगाव, ता. जामखेड, अतुल सावता मोहळकर, रा.नान्नज, ता. जामखेड, सुनिल रामा फुलमाळी, रा. नान्नज, ता. जामखेड, सोनु कुंदन वाघमारे, रा. आरोळे वस्ती जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर. अशा वरील सात लोकांचे १ लाख २८ हजार ५०० रुपये कीमतीचे मोबाईल हरवले होते.

याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल दाखल करण्यात आल्या होत्या. सदर तक्रारीच्या अनुषंघाने जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, यांनी एक पथक तयार करुन तांत्रिक माहीती व गोपनीय माहीतीच्या आधारे वरील लोकांचे गहाळ झालेले विविध कंपन्याचे १ लाख २८ हजार ५०० रुपये कीमतीच्या मोबाईलचा शोध लावण्यात यश आले. सदर मिळालेले मोबाईल हे वरील मुळ मालकच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे अहिल्यानगर, अपर पोलीस अधीक्षक वैभवकलूबर्मे अहिल्यानगर, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे, कर्जत विभाग कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दशरथ चौधरी, पो.कॉ. देविदास पळसे तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पो.कॉ. नितीन शिंदे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here