मिशन आरंभ सह इतर प्रज्ञाशोध परिक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले शाळेचे घवघवीत यश.

प्रतिकुल परिस्थितीत संपादन केलेले यश कौतुकास्पद ; विनायक राऊत.

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथील ऐतिहासिक असलेल्या जिल्हा परिषदेच्या मराठी मुले व मुली या शाळेमध्ये नुकताच विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बोलताना सामाजिक कार्यकर्ते व संत गोरोबा काका कुंभार पतसंस्थेचे चेअरमन विनायक राऊत म्हणाले की जिल्हा परिषदेच्या याच शाळेमध्ये आमचे सुद्धा शिक्षण झाले आहे. शाळेसी आमचं नातं भावना जुळलेल्या आहेत. याच शाळेत अगदी प्रतीकुल परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांनी संपादन केलेले यश कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश शेठ बाफना बोलताना म्हणाले की आज विद्यार्थ्यांनी संपादन केले यश हे कौतुकास्पद आहे. परंतु यामध्ये विद्यार्थ्यांचे आई वडील त्याच बरोबर शिक्षकांचाही खुप मोठा वाटा आहे. जामखेड केंद्राचे केंद्र प्रमुख राम निकम सर यांनी मिशन आरंभ या स्पर्धा परीक्षेची पार्श्वभूमी समजावून सांगितली व जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी या स्पर्धेच्या युगात कोठेही मागे राहू नये. ही भुमिका जिल्हा परिषद अहिल्यानगरची असल्याचे त्यांनी सांगितले.

खालील प्रमाणे यशस्वी विद्यार्थी जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

मिशन आरंभ निकाल
सन 2024- 25
🔹 जिल्हा गुणवत्ता यादी मधील प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी
1. संकेत नारायण गीते – 4 थी
2. स्वराज विलास मोरे – 4 थी

🔹तालुका स्तर गुणवत्ता यादीमध्ये प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी
1.  आरुष संजीवन रायकर– 4 थी
2. अंश बाळकृष्ण जरे – 4 थी
3. विराज महेंद्र लव्हाळे– 4 थी
4. आदित्य संदीप धाउड – 4 थी
5. आदित्य अनिल काळे – 4 थी

इतर प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी

1. श्लोक ब्रह्मदेव हजारे इ 1ली
2. कार्तिक नितीन भोरे 1 ली
3. अद्वय मनोज भोसेकर 1ली
4. हर्ष सचिन जाधव 1ली
5. अभी गणेश कापरे 1 ली
6. सारंग संपत सुळे 2 री
7. सार्थक दत्ता वीर 2 री
8. श्रेयश खंडेराव राऊत 2 री
9. श्रीराज सचिन शिंदे 2 री
10. अभिनव गोविंद साठे 2 री
11. प्रसाद राजेंद्र वनवे 3 री
12. सत्यजित सागर माकुडे 3 री
13. श्रेयश मारुती सुळे 3 री

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्राफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व संत गोरोबा काका कुंभार पतसंस्थेचे चेअरमन विनायक राऊत, आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश शेठ बाफना, केंद्र प्रमुख राम निकम सर, शाळा व्यवस्थापन समिती मुले शाळेचे अध्यक्ष नासीर चाचू सय्यद, मुलींच्या शाळेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी राळेभात, उपाध्यक्ष निलेश गायकवाड सर, मुले शाळेचे मुख्याध्यापक संजय कर्डीले व मुलींचे मुख्याध्यापक दत्तात्रय यादव सर, विलास मोरे, सचिन जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सागर माकुडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक संजय कर्डीले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कल्पना साबळे मॅडम, अंबादास जोगदंड सर, कल्पना मोरे मॅडम, सोनाली जोरे मॅडम, आदिंनी विशेष परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here