

कापड व्यावसायिकास दुकानात येऊन मारहाण, गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
दुकानामध्ये येऊन एकाने काहीएक कारण नसताना दुकानातील एका तरुणास मारहाण केली. या मारहाणीत तरुणाच्या डोक्याला मार लागल्याने तो जखमी झाला आहे. मारहाणीचे दृष्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे. याप्रकरणी एका व्यक्ती विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की फीर्यादी अमित मनोज पिपाडा वय 26 वर्षे, रा. शिवाजीनगर, जामखेड हा दि 4 ऑगस्ट 2025 रोजी एका दुकानात असताना बाबा डोके (पुर्ण नाव माहित नाही) रा. भुतवडा हा दुकानात आला व काही एक कारण नसताना फीर्यादी अमित पिपाडा यास मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर दुकानात असलेल्या कपड्याच्या रॅकवर तोंड आपटले या मारहाणीत फीर्यादी याच्या नाक, कान व डोक्याला गंभीर दुखापत केली आहे.
फिर्यादी अमित पिपाडा यास मारहाण करण्यात आली ती दुकानातील दृष्य सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाली आहेत. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. प्रवीण इंगळे हे करीत आहेत.





