राशीन येथील घटनेचा सावता परिषद जामखेडच्या वतीने निषेध, आज जवळा गाव कडकडीत बंद

जामखेड प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील राशीन येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या नामफलकाची तोडफोड करणार्‍यांना तात्काळ अटक करण्यात यावी व कायदा व सुव्यवस्था बिघडु नये याची दक्षता घ्यावी तसेच या घटनेचा निषेध करीत सावता परिषद जामखेडच्या वतीने तहसील यांना निवेदन देण्यात आले. आज दि 6 रोजी जवळा ग्रामस्थांच्या वतीने देखील जवळा गाव बंद ठेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला.

याबाबत सावता परिषद जामखेड चे तालुका अध्यक्ष सोमनाथ (नाना) राऊत व संतोष मोहळकर यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 2014 साली राशीन राशिन ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव घेऊन करमाळा रोड येथे असलेल्या चौकाला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले असे नामकरण केले. त्या नंतर समाज बांधवांनी तशा नावाचे फलक लावले होते. त्यानंतर आता 13 जुलै 2025 रोजी काही समाज बांधवांनी तेथे ध्वज उभारला. त्यावेळी समाज्याने रास्तारोको करुन नाव बदलु नये अशी भुमिका तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे केली होती. सदरील घटनेनुसार सर्व समाज बांधवांनी बैठक घेऊन भगवा ध्वज एका बाजुला आणि फलक एका बाजूला असे 31 जुलै 2025 रोजी घेण्यात आलेल्या प्रशासनाच्या बैठकीत ठरले होते.

मात्र काही समाज बांधवांना हे मान्य नसल्याने त्या लोकांनी दि 2 ऑगस्ट 2025 रोजी लावलेल्या फलकाची लाथा बुक्या मारत तोडफोड केली व जातीवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे या घटनेचा समस्त ओबीसी समाज माळी समाज व सावता परिषद जामखेड च्या वतीने करण्यात आला.

निवेदन देतावेळी सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ (नाना ) राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष श्री महेश (दादा) निमोणकर, सावता परिषद प्रदेश सदस्य संतोष भाऊ मोहळकर, समता ग्रुप अध्यक्ष संतोष भाऊ गव्हाळे, रा.स.पा. तालुकाध्यक्ष विकास जी मासाळ, फक्राबाद चे माजी सरपंच दिगंबर जगताप महासंग्राम युवा मंच जवळा अध्यक्ष किरण जी हजारे, जवळा येथील शिवसेना नेते नितीन कोल्हे अक्षय हजारे, दिगंबर म्हेत्रे, शाम म्हेत्रे, आणि इतर समाज बांधव उपस्थित होते.

चौकट

कर्जत तालुक्यातील राशीन येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या नामफलकाची तोडफोड करण्यात आली याचे पडसाद जामखेड तालुक्यात देखील उमटत आसुन या घटनेच्या पार्भूमीवर जामखेड तालुक्यातील जवळा गावात ग्रामस्थांनी देखील निवेदन देऊन निषेध व्यक्त करीत आज 6 ऑगस्ट 2025 रोजी जवळा बंदची हाक दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here