पुणे अग्निशमन दल यांच्याकडून पत्रकार विशाल अडागळे यांचा गौरव

पुणे प्रतिनिधी

पुणे अग्निशामक दल भारती विद्यापीठाचे प्रमुख प्रदीप खेडेकर साहेब व अग्निशामक दल टीम यांच्यावतीने पत्रकार विशाल अडागळे यांचा गौरव करण्यात आला.

पत्रकार विशाल बाळासाहेब अडागळे व जन हक्क टाइम्सचे संपादक अकबरभाई शिकलकर पत्रकारितेच्या माध्यमातून भारती विद्यापीठ पुणे अग्निशामक दल यांच्या मदतीने कात्रज परिसरामध्ये दत्त नगर येथे सुरक्षेच्या उपायोजना संदर्भात परिसरामध्ये घेतलेली कार्यक्रम, केलेली जनजागृती व वन्दे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज तसेच ई एस ओ इंडिया फाउंडेशन कडून भारत गौरव पुरस्कार उत्कृष्ट पत्रकारिता 2025 ने सन्मानित करण्यात आल्याने 10 जुलै 25 रोजी पुणे अग्निशामक दल भारती विद्यापीठ प्रमुख प्रदीप खेडेकर साहेब व अग्निशामक दल टीम यांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन केलेल्या कार्याचे कौतुक करत सन्मानित करण्यात आले. तसेच पत्रकार संघाच्या वतीने अग्निशामक दल व प्रदीप खेडेकर व सर्व टीमचे आभार व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here