Home क्राईम न्यूज जामखेड येथे रेशनचा काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन चाललेला 400 गोण्या तांदुळ पकडला

जामखेड येथे रेशनचा काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन चाललेला 400 गोण्या तांदुळ पकडला

जामखेड येथे रेशनचा काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन चाललेला 400 गोण्या तांदुळ पकडला

30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एका व्यापार्‍यांसह दोन जणांवर गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथुन सांगली याठिकाणी रेशनचा काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा 400 गोण्यांसह 30 लाख रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला आहे. या प्रकरणी एका व्यापार्‍यांसह दोन जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की गुरवार दि 26 जुन रोजी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जामखेड पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदयाची माहिती काढत होते. यावेळी या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, जामखेड ते करमाळ जाणाऱ्या रोडने टाटा 2518 ट्रक क्रमांक एमएच-17-बीडी-8102 मधुन रेशनिंगचा तांदुळ काळया बाजारात विक्रीसाठी जाणार आहे. या अनुषंगाने पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष जामखेड ते करमाळा जाणाऱ्या रोडवर आसलेल्या आयटीआय जवळ सापळा सापळा रचला. यावेळी काळ्याबाजारात तांदुळ विक्रीसाठी घेऊन जाणार्‍या वाहनास अडविण्यात आले. वाहन चालकास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुंदर बबन घुमरे, वय 60, रा. लोणी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. यानंतर सदर वाहनाची तपासणी केली असता ट्रकमध्ये 5 लाख रुपयांचा 400 गोण्या तांदुळ मिळून आला. पथकाने वाहन चालकास विश्वासात घेऊन मिळून आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता वाहन चालक हा ट्रकचा मालक असून ट्रकमधील तांदळाच्या गोण्या या योगेश मोहन भंडारी, रा.जामखेड, ता.जामखेड याच्या दुकानामधुन घेतल्या व तो सदरचा तांदुळ हा रेशनचा शासकीय स्वस्त धान्य वितरण योजनेतील असून तो विक्रीसाठी सांगली येथे घेऊन जात असल्याची माहिती सांगीतली.

पंचासमक्ष वाहन चालकाचे ताब्यातील 5 लाख रू किं.त्यात 400 गोण्या तांदुळ, 25 लाख रू किं. त्या टाटा 2518 कंपनीचा ट्रक क्रमांक एम. एच-17- बीडी- 8102 असा एकुण 30 लाख रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन वरील आरोपी विरूध्द जामखेड पोलीस स्टेशन गुरनं 362/2025 जिवनावश्यक वस्तु अधिनियम कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या मधिल दुसरा आरोपी व्यापारी योगेश मोहन भंडारी हा फरार झाला आहे.

सदर कारवाई सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर व गणेश उगले, उपविभागीय पोलीस अधिकारी, कार्यभार कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

चौकट

जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेशनचा काळा बाजार होत आहे. दोन महिन्यांपूर्वीच रेशनचा काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारे वहान तहसीलदार यांनी पकडले होते. मात्र तरी देखील रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाण्याचे प्रमाण थांबले नाही. स्थानिक गुन्हे विभागाचे पथकाने अहिल्यानगर येथुन येऊन कारवाई केली मात्र स्थानिक महसुल विभाग व पोलीस प्रशासन काय करते असा सवाल उपस्थित केला जात आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!