स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार संघटनेच्या वतिने उद्या जामखेड येथील खर्डा चौकात रास्तारोको आंदोलन
जामखेड प्रतिनिधी
शेतकरी कर्जमाफी व अपंगांच्या मानधनात वाढ यासह विविध मागण्या घेऊन प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांनी हाती घेतलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार संघटनेच्या वतिने जामखेड शहरातील खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत चे निवेदन नुकतेच तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
सहा दिवस उलटूनहीं राज्य सरकारकडून कोणतीही दखल घेतली नसल्याने बच्चूभाऊ कडू यांची तब्येत खालावली आहे. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव आणि शेतकरी संतप्त झाले आहेत, या आंदोलनाला आता राज्यभरातून पाठिंबा मिळत असून अनेक ठिकाणी सरकार विरोधात निदर्शने सुरू झाली आहेत.
याच अनुषंगाने शेतकरी कर्जमाफी व अपंगांच्या मानधनात वाढ यासह विविध मागण्या घेऊन प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांनी हाती घेतलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार संघटनेच्या वतिने रविवारी दिनांक 15 जून 2025 रोजी सकाळी दहा वाजता जामखेड शहरातील खर्डा चौक या ठिकाणी भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत चे निवेदन नुकतेच तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
निवेदन देतावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष नय्युम सुभेदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हनुमान उगले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष जनार्दन भोंडवे, प्रहार संघटनेचे दिव्यांग सेल तालुकाध्यक्ष सचिन उगले, प्रहार संघटनेच्या महिला तालुका आघाडी अध्यक्ष सौ. अनिता ढोले, वीरधवल भोसले, अशोक गायकवाड, कांतीलाल उगले, पांडुरंग भोसले, यासह इतर पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.