

जामखेड तालुक्यातील सुरू असलेल्या अवैध धंद्याचे नवीन पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या समोर आव्हान
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात राजरोसपणे पणे अवैद्य धंदे जोरात सुरू आहेत. मागिल आठवड्यात काही बातम्या प्रसिद्ध होताच मटक्याच्या टपऱ्या दोन दिवस बंद ठेवण्याचा दिखावा करण्यात आला. मात्र दोन दिवस बंद झालेल्या मटका टपऱ्या पुन्हा जोराने सुरू झाल्या आहेत. तसेच अवैद्य धंदे कलाकेंद्राचे काटेकोर नियम व गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचे आवाहन सध्या नवीन पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या समोर एक आव्हानच आहे.

जामखेड पोलीस स्टेशनला पुर्वी आसलेले पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची बदली झाली त्यामुळे त्यांच्या जागेवर नवीन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार घेतला आहे. सध्या मात्र जामखेड मध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्याचे पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या समोर मोठे आव्हान आहे कारण सध्या जामखेड तालुक्यात राजरोसपणे अवैद्य धंदे जोरात सुरू आहेत. मागिल आठवड्यात अवैध धंद्याविरोधात काही बातम्या प्रसिद्ध होताच पोलीस प्रशासनाने थातुर मातुर कारवाई केली होती पण पुन्हा प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. जामखेड शहरातील बाजार, तपनेश्वर गल्ली, सह अनेक ठिकाणी मटक्याची दुकाने सुरू आहेत. शहरातील कलाकेंद्रावर देखील नियम धाब्यावर बसवत कलेऐवजी त्या ठिकाणी डीजे लावुन डान्स सुरू आहे. तसेच कलाकेंद्र हे नियम धाब्यावर बसवून रात्रभर चालवण्यात येतात. त्यांच्या नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी प्रयत्न केले पाहिजेत.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी ने डोके वर काढले आहे मारामारी, गुटखा, मावा, अवैद्य दारु विक्री, खाजगी सावकारकी, अवैध धंदे, मटका व जुगार मोठ्या प्रमाणात राजरोसपणे सुरूच आहेत. त्यामुळे नवीन आलेल्या अधिकार्यांनकडुन गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी नागरीकांची अपेक्षा आहे. पोलिसांचे अवैध धंदे करणाऱ्या लोकांशी मैत्रीपूर्ण संबध आहेत हे सर्व जनतेला माहित आहे. नुतन पोलीस निरीक्षकांनी आता अवैध धंद्याविरोधात कारवाई करत आपल्या कामाची झलक दाखवणे गरजेचे आहे. तसेच तालुक्यातील वाढती गुन्हेगारी चा लवकरच बिमोड करतील अशी अपेक्षा सर्व सामान्य नागरिकांना अपेक्षा आहे.




