आमचे कपडे घ्या पण! शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांना मदत करा: प्रहार जनशक्ती पक्षाचे तहसीलदारांना निवेदन

जामखेड प्रतिनिधी

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चुभाऊ कडु यांचे गेल्या सहा दिवसांपासून आन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आद्यापर्यंत शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. याच संदर्भात या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी जामखेड तालुक्यात वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने करण्यात येणार आहेत.

याच संदर्भात जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आंदोलकांनी तहसीलदारांच्या दालनात आपले शर्ट काढुन टाकले व सरकाराला आमचे कपडे घ्या पण शेतकरी व दिव्यांगांच्या मागण्या मान्य करा अशी मागणी केली आणि सरकारने बच्चुभाऊ कडु यांच्या आंदोलनाची लवकर दखल घेतली नाही तर जामखेड तालुक्यातीलही तिव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी बोलताना जयसिंग उगले म्हणाले की बच्चुभाऊ कडु यांनी न भुतोना भविष्य आसा शेतकरी व दिव्यांगांच्या बाबत लढा सुरू केलेला आहे. आणि याला राज्यभरातुन मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शेतकरीराजा आज मोठय़ा आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे शासनाने कर्ज माफी करून सातबारा कोरा करावा तसेच ज्या घटकाला घरातुन समाजातुन दुर्लक्षित केले आहे अशा दिव्यांग बांधवांसाठी शासनाने मासिक सहा हजार रुपये मदत करावी सरकारने निवडणूकापुर्वी तशी घोषणाही केली होती.

पण आता शब्द पाळला जात नाही तसेच या दोन प्रमुख मागण्यांसाह आणखी पंधरा मागण्यांसाठी हे आन्नत्याग आंदोलन सुरू आहे दोन दिवसात निर्णय घेतला नाही तर राज्यासह जामखेडमध्येही तिव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

तसेच नय्युम शेख यांनी सांगितले की आम्ही या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी जामखेड तालुक्यातील विविध स्वरूपाचे आंदोलने करणार आहोत. तशा आशयाचे निवेदन शासनाला दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळवा आन्यथा गावपातळीवर दोन दिवसात तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आमचे कपडे घ्या पण शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांच्या मागण्या मान्य करा आसे सांगितले.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नय्युम शेख, जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले शहराध्यक्ष दिनेश राळेभात प्रमोद खोटे संजय मोरे विजय क्षिरसागर सचिन जाधव सुरेश नेटके सचिन उगले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here