

सीबीएसई बोर्ड मधुन कालिका पोदार लर्न स्कुलची विद्यार्थी कु. गार्गी अवसरे 95.60% घेऊन तालुक्यात प्रथम
जामखेड प्रतिनिधी
जामखेड, पाटोदा व आष्टी तालुक्यात सीबीएसई बोर्ड मधून कालिका पोदार लर्न स्कुलची विद्यार्थी कु. गार्गी अवसरे 95.60% घेऊन तीनही तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. चि. श्रेयश राख 94.40% द्वितीय, तर चि. लाभेश चोपडा 94.20% तृतीय क्रमांक मिळविला आहे. एकूण 58 विद्यार्थ्यांपैकी 31 विद्यार्थ्यानी 80% च्यावर गुण मिळवून उत्तीर्ण होऊन शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा लावला आहे.

जामखेड येथील सीबीएससी बोर्ड मान्यताप्राप्त कालिका पोद्दार लर्न स्कूलमध्ये यावर्षी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्ड परिक्षेमध्ये उत्कृष्ठ निकालाची परंपरा सलग दुसऱ्या वर्षीही कायम ठेवली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये कु. गार्गी अवसरे 95.60% प्रथम, चि. श्रेयश राख 94.40% द्वितीय, तर चि. लाभेश चोपडा 94.20% तृतीय क्रमांक व एकूण 58 विद्यार्थ्यांपैकी 31 विद्यार्थ्यानी 80% च्यावर गुण मिळवून उत्तीर्ण होऊन शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा लावला आहे. याही वर्षी शाळेचे व्यवस्थापक या समवेत शाळेचे प्रिन्सिपल सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सखोल मार्गदर्शनामुळे हे यश सहज शक्य झाले असे सूर सर्व विद्यार्थी व पालकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे तसेच या यशाचे परिसरामध्ये सर्वत्र कौतुक देखील केले जात आहे.




