• धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नेहमीच अन्याया विरोधात लढत राहिले – पोलीस निरीक्षक महेश पाटील
  • जामखेड येथे आ. रोहीत पवार मित्र मंडळ व शंभुराजे कुस्ती संकुल जामखेड यांच्या वतिने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी
  • जामखेड प्रतिनिधी
  • धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे नेहमी अन्याय व चुकीच्या रुढी परंपरा विरोधात लढत राहिले आहेत. त्यांच्या विचारान प्रमाणे तुमचा अचार, विचार व उद्देश चांगला पाहिजे, तसेच सर्व सामान्यांना न्याय देण्याचे काम केले पाहिजे असे मत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी छत्रपती शंभुराजे यांच्या जयंतीच्या निमित्ताने व्यक्त केले.
  • छत्रपती संभाजी महाराज यांची 368 वी जयंती देशभरात श्रद्धा आणि अभिमानाने साजरी केली जात आहे. केवळ मराठा इतिहासातच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात धर्मासाठी प्राणार्पण करणाऱ्या महान योद्ध्यांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्थान सर्वोच्च आहे. याच अनुषंगाने आ. रोहीत दादा पवार मित्र मंडळ व शंभुराजे कुस्ती संकुल जामखेड यांच्या वतिने मंगेश (दादा) आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड शहरातील खर्डा चौकात आज बुधवार दि 14 मे रोजी सकाळी दहा वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले.
  • यानंतर शंभुराजे कुस्ती संकुल जामखेड चे संचालक मंगेश (दादा) आजबे बोलताना म्हणाले की तरुणांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार डोक्यात घेऊन पुढे चालले पाहिजे, सोशल मिडिया एवजी महापुरुषांचे पुस्तके वाचुन पुस्तकी ज्ञान घेतले पाहिजे. शंभुराजे यांचे जिवन चरित्र हे खुप मोठे होते. ते एकही लढाई हारले नाहीत. आम्ही तरुणांसाठी 2019 रोजी शंभुराजे कुस्ती संकुल उभारले व ते चालवत आहोत तेव्हांपासून जामखेड शहरात छत्रपती शंभूराजे महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत..
  • यावेळी शंभुराजे कुस्ती संकुल चे संचालक मंगेश (दादा) आजबे, सुर्यकांत (नाना) मोरे, विजुशेठ कोठारी बापू कार्ले, पांडुराजे भोसले, संपत (नाना) राळेभात सुंदरदास बिरंगळ, चिराग आजबे, उमर कुरेशी, गणेश हगवणे, नरेंद्र जाधव यांच्या सह अनेक नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here