जामखेड येथील श्री राममंदीरात परशुराम जयंती उत्साहात साजरी

जामखेड प्रतिनिधी

परशुराम प्रतिष्टान जामखेड आयोजित  अत्यंत भक्तीमय वातावरणात श्री राम मंदीर जामखेड याठिकाणी आज मंगळवार दि.२९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

विष्णूचे साहवे अवतार व रेणुका मातेचे चिरंजीव भगवान परशुराम यांच्या मुर्तीची पुजा करण्यात आली त्यानंतर श्रीकांत बाळकृष्ण होशिंग (सर) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते व नंतर आरती करून प्रसाद वाटप करण्यात आले व त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. भगवान परशुराम हे विष्णु चे साहावे अवतार आहेत जसे प्रभु श्री राम, श्री कृष्ण हे देखील विष्णुचेच अवतार आहेत यांची जयंती साजरी केली जाते त्याप्रमाणे हिंदु बांधवांकडुन भगवान परशुराम यांची जयंती साजरी होताना दिसत नाही, म्हणजेच काय कि आपल्याला आपली संस्कृती, आपले देव व धर्म व यामागील ईतिहास आजुन समजलेला नाही ही खुप खेदाची बाब आहे.

आजची आपली तरूण पिढी व्यसनाधीन व धर्म आचरणापासुन लांब जात आहे या तरूण पिढीला आपली सनातन संस्कृतीशी जोडुन ठेवण्यासाठी या प्रकारचे उपक्रम हे संस्थेमार्फत घेण्यात येत आहेत आजच्या काळात हिंदु धर्मावर हल्ले होत असताना या प्रकारे सर्व हिंदु बांधवांनी एकत्र येऊन आपली संस्कृती टिकून ठेवणे काळाची गरज आहे. जे राष्ट्र आपला ईतिहास किंवा संस्कृती टिकून ठेऊ शकत नाही ते राष्ट्र या काळात जगाच्या नकाशा वरून संपण्याच्या दिशेने वाटचाल करत असते हा ईतिहास आहे.

यावेळी आपले व्याख्यान पन विचार व्यक्त करताना होशिंग सर म्हणाले कि जे गोर गरीब कष्टकरी लोकांवर अन्याय व अत्याचार करत होते त्यांचा समुळ नायनाट भगवान परशुराम यांनी त्याकाळी केला त्याप्रमाणे आजच्या युगात पहेलगाम सारख्या घटना वाढत आहेत आणि हे होणारे हल्ले रोखण्यासाठी देखील आपल्या सर्वांच्या मनात भगवान परशुरामाचे विचार रूजने ही काळाची गरज आहे. आपण देखील या घटना घडु नयेत म्हणून आजच्या युगात एकत्र येऊन आपल्या देशाची व धर्माची सेवा करणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे श्रीयुत चांदेकर सरांनी देखील या कार्यक्रमाचे कौतुक केले. सर्व तरूण पिढी एकत्र येऊन छान उपक्रम घेतला त्याबद्दल अभिनंदन केले व भविष्यात कोणतीही गरज भासली त्यासाठी आम्ही सर्व तुमच्या तरूणांच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे आहोत अशी ग्वाही दिली.

यावेळी दि.पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उध्दव (बापु) देशमुख, चांदेकर सर, सुनिल होशिंग, सखाराम काळे, हनुमंत देशमुख, गिरीधारीलाल ओझा, ओकांर कुलकर्णी, बाप्पु कुलकर्णी, निलेश देशमुख, हर्षल देशमुख, धनंजय काळे, दिग्विजय देशपांडे, रोहीत देशमुख, अजिंक्य कुलकर्णी, प्रमोद कुलकर्णी, विजय कुलकर्णी, बंटी पाटील, विनोद कुलकर्णी, सचिन देशमुख, गणेश जोशी, तसेच महीला भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here