

पोतेवाडी पाणीपुरवठा विहिरीवरील अनाधिकृत विद्युत मोटारी हटवल्या, शेजारी विहिरीवरील क्रेन व खरीप ही गायब
जामखेड प्रतिनिधी
पोतेवाडी पाणीपुरवठा विहिरीवर अनाधिकृत विद्युत मोटारी व शेजारीच दुसर्या विहिरीचे सुरू आशी बातमी रोखठोक युट्यूब न्यूज चॅनेलला प्रसिद्ध होतात पाणीपुरवठा विहिरी वरील तीन विद्युत मोटारी शेजारी विहिरीवरील क्रेन, शेजारचे खरीप एका दिवसात हटवण्यात आले आहे. सध्या विहिरीवर एकच मोटार आहे शेजारी विहिरीचे काम सुरूच नाही असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

जामखेड तालुक्यात जलजीवन कामामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी आहेत. यातच पोतेवाडी येथे अजब प्रकार उघडकीस आला आहे. गावात तीव्र पाणी टंचाई असतानाही पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवर तीन विद्युत मोटारीच्या साहाय्याने सरपंचाच्या कुटुंबातील शेतीला पाणीपुरवठा होत आहे. शेती हिरवीगार तर गावात तीव्र पाणी टंचाई आहे. यात विशेष भर म्हणजे जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीच्या जवळच मनरेगा योजनेअंतर्गत स्वत:च्या विहिरीचे काम सुरू आहे तेही अगदी पाणीपुरवठा योजनेच्या पन्नास फूट अंतरावरच विहिरीचे काम सुरू आहे. अशा आशयाची बातमी युट्यूब न्यूज चॅनलला प्रसिद्ध झाली होती. ही बातमी प्रसिद्ध होताच विहिरीत तीन मोटारी तसेच शेजारी विहिरीवरील क्रेन, खरीप ताबडतोब हटवले आहे. या विहिरीवरील खरीप उचलणारा ट्रॅक्टर आणि जेसीबी यांची पण चौकशी लागावी असं देखील मागणी तक्रारदार बंडु सगळे यांनी केली आहे.

तालुक्यातील पोतेवाडी येथे जलजीवन कामामध्ये मोठ्या प्रमाणावर सावळा गोंधळ आहे. गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यावधी रूपयांच्या निधीतून पाणीपुरवठ्यासाठी नान्नज हद्दीत विहीर व तेथून पाईपलाईन करण्यात आली. अद्याप हस्तांतरण बाकी आहे. सध्या गावात तीव्र पाणी टंचाई आहे. काही ठिकाणी खाजगी टँकर आहेत. पाणी टंचाई असताना सरपंच प्रविण शिवाजी पोते यांनी पाणीपुरवठा विहिरीतून स्वत:च्या शेतातील पिकाला पाणी सुरू होते. तसेच या विहिरीच्या पन्नास फूट अंतरावर स्वत:च्या शासकीय योजनेतून घेतलेल्या विहिरीचे काम सुरू आहे. शासकीय योजनेतून मिळालेली विहिर इतक्या जवळ कशी मंजुरी दिली याकडे अधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाले आहे. याबाबत गावातील गणेश (बंडू) नामदेव सगळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर यांना देखील याबाबत निवेदन दिले आहे.







