आनेक वर्षापासून कुपन ऑनलाइन होत नाहीत, पुरवठा विभागाचा सावळा गोंधळ
नागरिकांचे हेलपाटे थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन करणार:- राहूल पवार
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील तहसील कार्यालयात रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी अर्ज व पूरक कागदपत्रे देऊनही सहा सहा महिने वर्षे वर्षे लोटले तरी ऑनलाईन केले गेले नाही. नागरिक हेलपाटे मारून त्रस्त झाले मात्र तहसिल प्रशासनाच्या या अनियंत्रित कारभाराला नागरिक कंटाळले आहेत. पुरवठा विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे. या ठिकाणी महीला व जेष्ठ नागरिकांची कुपन ऑनलाईन ची कामे होत नसल्याने नागरीक वैतागले आहेत. चकरा मारून मारून नागरिक कंटाळले आहेत.
या गंभीर बाबीकडे तहसील प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. नागरीकांची ससेहेलपट न थांबल्यास येणाऱ्या काही दिवसात तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते राहुल पवार यांनी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.
जामखेड येथील पुरवठा विभागात वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक महिला या पुरवठा विभागात हेलपाटे मारून झाले हैराण झाले आहेत. गेल्या 2020 पासून ते 2025 पर्यंत यापुरवठा विभागात चकरा मारत आहेत. तरी पण नविन रेशन कार्ड ऑनलाइन होत नाही. तसेच विवाहित मुलीचे नाव कमी करणे, नवीन विवाहित सुनांचे नाव समाविष्ट करणे, तसेच मयताचे नाव कमी करणे, धान्य मिळवण्यासाठी कुपन ऑनलाईन करणे यासाठी नागरिक पुरवठा विभागात हेलपाटे मारत आहेत.
यासर्व गोष्टी ऑनलाइन करण्यासाठी दररोज तहसील कार्यालयातील जेष्ठ नागरिक देखील पुरवठा विभागाचे उंबरठे झिजवत आहेत. याठिकाणी पुरवठा विभागात सक्षम अधिकारी नसल्याने पुरवठा विभागाचा बोजवारा उडाला आहे.एकुणच तहसील कार्यालयातील अनेक विभागाची अशीच कामाच्या बाबतीत अनियंत्रित पणा आहे. तसेच याठिकाणी शासनाने टेंडर पद्धतीने नेमणूक केलेल्या ऑनलाईन करणारे कर्मचारी हे देखील नागरिकांना अरेरावेची भाषा वापरत आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना अरे तुरेची भाषा वापरत आहेत, समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. असं नागरिकांनी बोलताना सांगितले आहे. पुरवठा विभागात येणाऱ्या जेष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांची जर हेलपाटे थांबली नाही तर येत्या काही दिवसात तालुक्यातील सर्व जेष्ठ नागरिकांना घेऊन तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते राहुल पवार यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here