जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई 19 लाखांचा गुटखा पकडला
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आटलेल्या छाप्यात तब्बल 19 लाख 53 हजार रुपयांची सुगंधित तंबाखू व पान मसाला नाव असलेला गुटखा पकडला आहे. याप्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढी मोठी कारवाई आहील्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक खर्डा येथे येऊन करत आहे मात्र खर्डा पोलीस काय करतात असतात प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
खर्डा परीसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत याच अनुषंगाने खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील धनेगाव या ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मोठी कारवाई केली आहे. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला जामखेड तालुक्यातील धनेगाव या ठिकाणी गुटख्याचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने दि 26 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी साडेसात वाजता धनेगाव याठिकाणी छापा टाकत 15 लाख 60 हजार रुपये कीमतीचा हीरापान मसाला असे नाव असलेल्या गुटख्याच्या 1225 बॅग, 3 लाख 93 हजार 120 रु कीमतीचे रॉयल 717 असे नाव असलेली सुगंधित तंबाखू च्या 63 बॅग व पाचशे रुपये कीमतीचा नळ्या रंगाचा बारदाणा आशी एकुण 19 लाख 53 हजार 620 रु कीमतीचा गुटखा पकडण्यात आला आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.कॉ रोहित मधुकर मिसाळ यांनी खर्डा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड हे करत आहेत.
चौकट
खर्डा परीसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे व दारु विक्री होत आहे. खर्डा शहरात देखील सर्रासपणे महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता प्रतिबंधित असलेला गुटखा , सुगंधित पान मसाले, सुगंधित तंबाखू विक्री होत आहे. याच अनुषंगाने दैवदैठण येथील महीलांनी व ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात दारु पकडुन दिली. या नंबर नायगाव येथील ग्रामस्थांनी देखील गावातील दारु विक्री बंद व्हावी यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यातच धनेगाव याठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैद्य गुटखा पकडला असल्याने खर्डा पोलीस करतात काय असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.