जामखेड प्रतिनिधी

समाज्यात विद्यार्थी घडवत असताना आपणही या समाज्याचे देणे लागतो. याच पार्श्वभूमिवर कोरोना संकटात अधार बनलेल्या आरोळे कोविड सेंटरला जामखेड तालुक्यातील शिक्षकांनी रुग्णांसाठी पन्नास अॉक्सिजन सिलेंडर, धान्य व किराणा वाटप करण्यात आला.

सामाजिक जीवन जगत असताना पिढी घडवण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. विद्यार्थ्यांसाठी शिक्षक दीपस्तंभाचे कार्य करत असतात. चुकलेल्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्यदेखील शिक्षक करत असतात, अशाच जामखेड येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी खारीचा वाटा म्हणून आलेल्या कोरोना संकटात आपला मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल सर्व स्तरातून कैतुक होत आहे.

या प्रसंगी सभापती सुर्यकांत मोरे,पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, प्रा.लक्ष्मण ढेपे, आण्णासाहेब सावंत, बापुसाहेब गायकवाड, जेष्ठ मार्गदर्शक उत्तम पवार, समिती अध्यक्ष विजयकुमार जाधव, जितेंद्र आढाव, प्रताप पवार, अशोक घोडेस्वार, पोपट तुपसौंदर ,सुशील पौळ, संजय घोडके, दत्ता ऊदारे , दत्ता भोसले, प्रदिप कांबळे, सुरेश मोहीते, जालिंदर यादव, किशोर राठोड, गणेश देवकते, ज्ञानू राठोड, राजेश्वर पवार, राहुल चव्हाण ,पांडूळे सर, पुलावळे सर, गोटमवाड सर, कौले सर, जटाडे, अझर सर, सवाई सर, विठ्ठल पवार, शिंदे सर, गोरड सर, साठे सर, भिसे सर, चव्हाण सर, शिल्पा साखरे ,माने मॕडम,आलमले मॕडम,जायभाय मॕडम,पाडळे मॕडम,कौले मॕडम,आरडक मॕडम,फलके मॕडम,काळे मॕडम,आदी शिक्षक बांधव व भगिणी उपस्थित होते.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here