जामखेड रोखठोक….. 

संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या आरोळे पॅटर्न ला आता तालुक्या बरोबरच जिल्ह्यातुन देखील मदतीचा ओघ सुरू झाला आहे. याच अनुषंगाने अहमदनगर केमिस्ट असोसिएशन देखील कोविड रुग्णांसाठी मोफत औषधरुपी मदत करुन माणुसकीचा वसा जपला आहे.

जामखेड येथील डॉ रवी आरोळे व शोभाताई आरोळे या दाम्पत्यांच्या रुगसेवेतुन, आणि लोकसहभागातून चालवल्या जाणार्‍या आरोळे कोविड सेंटरच्या कार्याला प्रेरित होऊन, आज दि 25 रोजी नगर येथील फर्मा, एजन्सीज आणि मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह च्या माध्यमातून मदत करण्यात आली. साधारणतः तीन लाख रु बाजारमूल्य किमतीची, कोविड रूग्णांना उपचारात लागणारी सर्वप्रकारची औषधे, संस्कृती फार्मासयुटिकलस् चे मा.श्री. सुरेंद्रकुमार बोराडे व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह सुचीत शिंदे यांच्या पुढाकाराने, अहमदनगर केमिस्ट असोशिएशन व MSMRA (Maharashtra State Medical Representative Association) याच्या सहकार्याने औषधांचा साठा, आरोळे कोविड सेंटर चे संचालक डॉ रविदादा आरोळे यांना सुपूर्त करण्यात आला.

यावेळी बोलताना , आम्ही आमच्या असोशिएशन आणि मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह यांच्या माध्यमातून पुढील वेळी जास्तीस्त जास्त मदत देण्याची भावना संस्कृती फार्मा सुरेंद्र बोराडे यांनी व्यक्त केली. या प्रसंगी बोलताना रविदादा यांनी औषधांची मदत केल्याबद्दल काकडे फार्मा, तिरुपती मेडिकल, वर्धमान एजन्सी, शेजल एजन्सी, माऊली फार्मा, अथर्व एजन्सी, विशाल एजन्सी, सागर एजन्सी, झालानी एजन्सी, संस्कृती एजन्सी, यां सर्वांचे मनस्वी अभार मानले. या वेळी डॉ रविदादा आरोळे व सर्व आरोग्य कर्मचारी तसेच संस्कृती फ्रार्मा चे सुरेंद्र बोराडे, मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह सूचित शिंदे. डॉ बोराडे, सुनील जगताप सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

2 COMMENTS

  1. Link exchange is nothing else however it is
    simply placing the other
    person’s weblog link on
    your page at appropriate place and other person will also
    do similar for you.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here