रोखठोक अहमदनगर…
जिल्ह्यात काेराेना संसर्गाचे थैमान सुरू आहे. लागाेपाठ दुसऱ्यांदा काेराेना संसर्गाचा आकडा तीन हजारांपुढे गेला. त्यामुळे काेराेना साखळी ताेडण्याचे जिल्हा प्रशासन, आराेग्य यंत्रणेसमाेर आव्हान निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 56 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे. सलग दुसऱ्यांदा सर्वाधिक रुग्णांची नाेंद झाली आहे. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले असून, सातशे पुढे आकडा गेला आहे. नगरमधील 730 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरापाठाेपाठ राहाता आणि नगर तालुक्यात तीनशेजवळ रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर शहर 730, राहाता 285, संगमनेर 168, श्रीरामपूर 178, नेवासे 155, नगर तालुका 273, पाथर्डी 144, अकाेले 115, काेपरगाव 166, कर्जत 199, पारनेर 128, राहुरी 140, भिंगार शहर 91, शेवगाव 149, जामखेड 46, श्रीगाेंदे 61, इतर जिल्ह्यातील 28 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 835, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 525 आणि रॅपिड चाचणीमध्ये 1696 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.






