कै. आबासाहेब प्रतिष्यानच्या वतीने दिघोळ, माळेवाडीत स्त्री जन्माचे स्वागत, जन्मलेल्या मुलीच्या नावे पाच हजार रुपयांचा धनादेश
जामखेड प्रतिनिधी
वारसा जनसेवेचा कै. आबासाहेब प्रतिष्यानच्या वतीने स्त्री जन्माचे स्वागत करूया यासंकल्पनेतून दिघोळ, माळेवाडी येथील जन्माला आलेल्या मुलीच्या नावे पाच हजार रुपयांचा धनादेश तहसीलदार गणेश माळी यांच्या हस्ते देण्यात आला.
वारसा जनसेवेचा आबासाहेब सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून कै, पै. रामभाऊ बाबुराव रसाळ आबा २०२४ /२०२५ साठी स्त्री जन्माचे स्वागत करूया या संकल्पनेतून जामखेड तालुक्यातील दिघोळ आणि माळीवाडी गावातील कोणत्याही कुटूंबात मुलगी जन्माला आलीकी त्या मुलीच्या नावे आबासाहेब सामाजिक प्रतिष्ठान मार्फत पाच हजार रुपयांचा चेक दिला जातो. त्याच कार्यक्रमाचा धनादेश वाटप कार्यक्रम काल तहसीलदार गणेश माळी यांच्या उपस्थितीत झाला. आबासाहेब सामाजिक प्रतिष्ठान मार्फत रसाळ कुटुंबातील पैलवान धीरज रसाळ व पैलवान सुरज रसाळ हे सतत सामाजिक उपक्रम करतात. त्याच उपक्रमापैकी हा एक स्तुत्य उपक्रम त्या उपक्रमाचा काल धनादेश वाटप कार्यक्रम झाला.
आबासाहेब प्रतिष्ठनमार्फत जेवढे काही सामाजिक करता येईल तेवढे काम करणार असं दोन्ही रसाळ बंधूंनी घोषित केलं आजपर्यंत केलेल्या कार्यक्रमा पैकी सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे सार्वजनिक नवरात्र उत्सवा निमित्त महाराष्ट्रातील राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम नऊ दिवस केले जातात. प्रत्येक शिवजयंतीला वकृत्व स्पर्धा, १५ ऑगस्ट रोजी देखील प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रम राबवले जातात. पहिली ते दहावी विद्यार्यांना स्पोर्टकिट वाटप केले. आबासाहेब प्रतिष्ठान सामाजिक उपक्रम करत आहे आणि करत राहणार अशी ग्वाही रसाळ बंधूंनी दिली. तहसीलदार गणेश माळी, हभप रामकृष्ण रंधवे महाराज, खर्डा पोलीस स्टेशनचे एपीआय विजय झंजाड, जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव, कृषी अधिकारी रवींद्र घुले, ग्रामविकास अधिकारी रफीक तांबोळी, दिघोळ माळेवाडी मधील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.