संविधान दिनानिमित्त होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे: विकिभाऊ सदाफुले यांचे आवाहन
जामखेड प्रतिनिधी
भारतीय समाजासाठी प्रजासत्ताक दिनच संविधान सन्मान दिन असून भारतीय संविधान अंमलात येऊन ७५ वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सालाबादप्रमाणे यावर्षीही समस्त भिमसैनिक जामखेड तालुका व संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने दि. २६ जानेवारी रोजी जामखेड येथे संविधान अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार असून “भव्य संविधान सन्मान पायी रॅली” भारतीय संविधान प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन सुपरस्टार महाराष्ट्राचा गायक संतोष जोंधळे यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार असून संविधान प्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन समस्त भिमसैनिक जामखेड तालुका संघटनेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी केले आहे.
समस्त भिमसैनिक जामखेड तालुका संघटनेच्या वतीने गेली १२ वर्षांपासून संविधान सन्मान दिन या कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येते. याही वर्षी २६ जानेवारी रोजी या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन जामखेड शहरातील बाजार तळावर असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरासमोर सायंकाळी ०६.०० वा. सुपरस्टार महाराष्ट्राचा गायक संतोष जोंधळे यांचा गीतगायनाचा कार्यक्रम होणार असून त्यापूर्वी सायंकाळी ०४.०० वाजता “भव्य संविधान सन्मान पायी रॅली” सायंकाळी ०५.०० वाजता भारतीय संविधान प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन अश्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण तमाम संविधान प्रेमींनी संविधान अमृत महोत्सवामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी केले आहे.