जळगावमध्ये भीषण रेल्वे दुर्घटना! एक्स्प्रेसने ट्रॅकवर बसलेल्या प्रवाशांना उडवलं, 7ते 8 जण ठार, काही प्रवाशांचे शीर धडावेगळे झाले, काहींचे झाले 2 तुकडे,
जळगाव: जळगावनमधून रेल्वे दुर्घटनेची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या. त्याचवेळी समोरून आलेल्या बंगळुरू एक्स्प्रेसने प्रवाशांना चिरडलं.
या दुर्घटनेमध्ये 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर काही प्रवाशी हे गंभीर जखमी झाले आहे. घटनास्थळी रुळावर अत्यंत भयानक असं दृश्य आहे. काही जणांचे शीर धडावेगळी झाली आहे तर काही जणांचे दोन तुकडे झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 4:30 वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानकाच्या जवळ ही घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेस ही लखनऊवरून मुंबईच्या दिशेनं येत होती. परधारे गावाजवळ पोहोचली असता एका बोगीतून चाकाखालून धूर येत असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे आग लागली अशी अफवा पसरली. त्यामुळे लोकांना रेल्वे रुळावर उड्या मारल्या. पण त्याचवेळी बंगळुरू एक्स्प्रेस सुसाट वेगात आली. त्यामुळे काही प्रवाशी हे रेल्वेखाली सापडले. त्यामुळे काही प्रवाशांचे शीर धडा वेगळे झाले. तर काही जणांचे दोन तुकडे झाले. काही जणांनी पुलावरून खाली उड्या मारल्या.
दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे विभागाकडून माहिती मिळाली आहे, पाचोरा रेल्वे स्थानकापासून जवळ ही घटना घडली. पुष्कर एकस्प्रेस जागेवर उभी होती. बोगीतून काही प्रवाशांनी उड्या मारल्या. यात सात ते आठ जण जखमी झाले आहे. तर काही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना 4:20 वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी 8 रुग्णवाहिका रवाना झाल्या आहेत. घटनास्थळी एक रुग्णवाहिका हजर आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं जात आहे.
जळगावच्या माहेजी जवळ पुष्पक एक्स्प्रेस असताना आग लागल्याची अफवा पसरली. कोणीतरी साखळी ओढून गाडी थांबवली. गाडी थांबताच डाऊनच्या रेल्वे रुळावर प्रवासी उतरून उभे होते तेवढ्यात भुसावळकडे भरधाव वेगाने जाणारी कर्नाटक एक्स्प्रेस खाली सापडून काही प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबई आणि भुसावळकडे जाणाऱ्या काही गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.