महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा जामखेड येथे निषेध
देशासह दलित समाजाची माफी मागावी संतप्त भिमसैनिकांची मागणी.
जामखेड प्रतिनिधी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत बेताल वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जामखेड तालुका समस्त भिमसैनिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी जामखेड शहरातील खर्डा चौकात समस्त भिमसैनिकांनी “भव्य निर्देशने आंदोलन करण्यात आले.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमान कारक वक्तव्य केले त्यामुळे देशातील सर्व दलित समाज व आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या असून अमित शहा यांनी सर्व देशाची माफी मागावी. तसेच ते कोणत्या पक्षाचे किंवा जातीधर्माचे आहेत याबद्दल काही देणे घेणे नाही. परंतू ते या देशाचे गृहमंत्री असताना त्यांनी असे वक्तव्य करणे निंदनीय आहे. त्याचा आम्ही समस्त भिमसैनिक जामखेड तालुका संघटनांनी व आंबेडकर प्रेमी जनता निषेध करतो. तसेच यापुढेही जर कोणी असे वक्तव्य किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला तर यापेक्षा तिव्र पध्दतीने अंदोलन करून निषेध केला जाईल. यामुळे जर अमित शहा यांनी माफी मागितली नाही तर महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश बंद होईल असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी व्यक्त केले.
आंबेडकर म्हणजे फॅशन नाही. आंबेडकर म्हणजे आमची अस्मिता आहे. असे म्हणत जामखेड तालुका समस्त भिमसैनिक संघटनेच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत बेताल वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जाहीर निषेध करण्यासाठी जामखेड शहरातील खर्डा चौकात “भव्य निर्देशने आंदोलन करण्यात आले. यावेळी भिमसैनिक सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, भिमटोला ग्रुपचे बापुसाहेब गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सदाफुले, प्रा.सुनिल जावळे, राजेंद्र सदाफुले, वंचितचे प्रवक्ते बापुसाहेब ओव्हळ, सामाजिक कार्यकर्ते वसीमभाई कुरेशी, दादासाहेब घायतडक, बाळासाहेब आव्हाड, सचिन आण्णा सदाफुले, विक्रांत घायतडक,मुकुंद घायतडक, सचिन जाॅकी सदाफुले, सुकेंद्र सदाफुले, रंजन मेघडंबर, मनसे ता.उपाध्यक्ष सनी सदाफुले, बाळासाहेब घायतडक, वंचितचे ता.अध्यक्ष अतिश पारवे, किशोर सदाफुले, दिपक घायतडक, रवि सदाफुले, रिपाईचे ता.अध्यक्ष प्रमोद सदाफुले, रवि सोनवणे, अमोल सदाफुले, सुनिल काबंळे, किशोर काबंळे, संतोष थोरात, शेखर मोरे, लखन मोरे, सुखदेव घोडेस्वार, सुर्यकांत सदाफुले, अंकुश पुलावळे, मंगेश घोडेस्वार, गणेश घायतडक, सोनू सदाफुले, पप्पुराज सदाफुले, केतन घायतडक, सनी प्रिन्स सदाफुले, प्रतिक सदाफुले, विकीभाई गायकवाड, विकी काबंळे, अक्षय घायतडक, अक्षय गायकवाड, मिंलिद हराळ, हानुमान जावळे, भारतीय बौद्ध महासभेचे महिला जिल्हा सचिव सुरेखा सदाफुले, कुसुम साळवे, अरुणा सदाफुले सह आदी शेकडो भिमसैनिक व नागरिक उपस्थित होते.
दिल्ली येथे चालु असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून अपमानीत केले याचे पडसाद देशासह जामखेड शहरात उमटताना दिसले. आज दि. २० डिसेंबर रोजी शेकडो भिमसैनिकांनी हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा व निळे ध्वज घेऊन खर्डा चौकात निर्देशन आंदोलन केले. यावेळी काही काळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.
सुमारे १ तास चाललेल्या आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर झिंदाबाद, संविधान झिंदाबाद, जोर से बोलो जय भिम, अमित शहा मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी संतप्त भिमसैनिकांनी गृहमंत्री अमित शहा यांनी देशासह दलित समाजाची माफी मागावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिले.
error: Content is protected !!