Home ताज्या बातम्या शाळेची व शिक्षकाची बदनामी थांबवा अन्यथा गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा
शाळेची व शिक्षकाची बदनामी थांबवा अन्यथा गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील अहिल्यादेवी नगर शाळेतील कामकाज व्यवस्थित चालू आहे. येथील दोन्ही शिक्षक वेळेवर शाळेत येतात व पूर्ण वेळ शाळेत राहून शिकवण्याचे काम करतात. शालेय विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन, गुणवत्ता चांगली असून सर्व मुले आवडीने शाळेत जातात नवनाथ बहिर हे शाळेत हजर झाल्यापासून शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये खूप चांगला बदल झालेला आहे. सर्व काही व्यवस्थित असताना जे शाळेचे पालक नाहीत अशा व्यक्ती कडून शाळेची व शिक्षकाची बदनामी होत आहे. शिक्षकाबद्दल तक्रार केली आहे. तेव्हा शाळेची व शिक्षकाची बदनामी थांबवावी अन्यथा आम्ही ग्रामस्थ गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसू असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांना दिला आहे.
अहिल्यादेवी नगर शाळेत नवनाथ बहिर सरांनी आमचे उद्बोधन करून लोकसहभाग वर्गणी करून तसेच शाळेसाठी पदरमोड करून स्वखर्चाने शाळेतील अनेक कामे केली आहेत. अशा प्रामाणिक व चारित्र्यसंपन्न शिक्षकांबद्दल आमच्या मुलांना व आम्हालाही त्यांचा अभिमान वाटतो. ते राबवीत असलेले विविध उपक्रम यामुळे मुलांच्या गुणवत्ता व कलागुणात चांगली वाढ झालेली आहे. त्यामुळे मुले आवडीने शाळेत जात आहेत. आमच्या शाळेबद्दल मुलांबद्दल अथवा शाळेतील शिक्षकांबद्दल आमची गावकऱ्यांची कसलीही तक्रार नाही.
शाळेतील मुलांचे पालक नसलेल्या जामखेड मधील आव्हाड या व्यक्तीने शाळेतील शिक्षक बहिर सर यांची शालेय कामकाजा बाबत तक्रार केली आहे. प्रत्यक्षात त्या व्यक्तीचा शाळेशी कोणताही संबंध नाही. तो पालक नसल्याने त्याला शाळेचे कामकाज व विद्यार्थ्यांची गुणवत्ता याबाबत कोणतीही कल्पना नाही. तरी मुद्दाम शिक्षकांची व पर्यायाने शाळेची बदनामी करण्याचे हेतूने संबंधित व्यक्तीने तक्रार केल्याचे दिसून येते. तरी आपणास नम्रपणे विनंती करण्यात येते की, आम्हा पालकांची शिक्षकाबद्दल कोणतीही तक्रार नाही. व या अहिल्यादेवी नगर वस्तीवरील रहिवासी किंवा पालक सोडून इतर कोणी तिसऱ्या व्यक्तीने शाळेबद्दल तक्रार केल्यास ती ग्राह्य धरू नये. व ती चौकशीसाठीआणू नये. असे निवेदनात म्हटले आहे.
विनाकारण चुकीच्या तक्रारी करून शाळेतील शिक्षकांना त्रास दिल्यामुळे शाळेचे व शाळेतील विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाल्यास आम्ही सर्व पालक गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू. तरी आमच्या विनंती अर्जाची विचार व्हावा ही नम्र विनंती गटविकास अधिकारी शुभम जाधव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदावर शिवाजी म्हेत्रे, अजय काशिद, संदिप मैंड, भाऊसाहेब म्हेत्रे, दत्ता म्हेत्रे, विशाल दणाणे, वजिर पठाण, नजीर पठाण, केशर भोगे, अर्चना भोगे, रेषा भोगे, विमल भोगे, सुभाष भोगे, अर्चना सराफ, स्वाती म्हेत्रे, संगिता हजारे, कावेरी काशिद यांच्या सह अनेक पालकांच्या सह्या आहेत.
error: Content is protected !!