परभणी येथील घटनेतील आरोपीस कठोर शासन करण्यात यावे तसेच कोठडीत मृत्यू मुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आर पी आयचे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान शिल्पाची एका माथेफिरूने दि १० डिसेंबर रोजी तोडफोड करून निंदनीय कृत्य केले व तमाम महाराष्ट्रातील शाहू फुले आंबेडकरी विचारांच्या जनतेचा अपमान केला. त्याचा निषेध व्यक्त करण्यात आहे. पोलिसांनी निरपराध भीमसैनिकावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. कोंबिग ऑपरेशन करून अन्याय केला आसुन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या उच्च शिक्षित तरूणाचा मृत्यू झाला. त्याला जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन देता वेळी जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांनी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की, मयत सूर्यवंशी यांच्या कुटुंबास 25 लाखाची मदत मिळावी, परभणी घटनेतील आरोपी वर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करावा, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस कडक शासन व्हावे अशी त्यांनी मागणी केली. जामखेडचे तहसीलदार गणेश माळी, जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना आर.पी.आय.चे वतीने निवेदन देण्यात आले. सदर परभणी येथील घटनेचा आर.पी.आय. आठवले पक्षाच्या वतीने जामखेड तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येवून निषेध नोंदविला.
यावेळी आर.पी आय.चे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, जामखेड तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, शिवाजी साळवे, सतीश साळवे, सुनील सकट, रवी सदाफुले, ॲड. अक्षय साळवे, अंकुश गायकवाड, युवराज गायकवाड, रुकसाना पठाण, राम साळवे, महादेव महारनवर, उत्कर्ष भालेराव, गौतम मोरे, सागर घायतडक, पोपट फुले, विनोद समुद्र, काशिनाथ सदाफुले, बापू जावळे, सागर चव्हाण, भीमा शिंदे, संदीप मोरे, रवी चौधरी, अभिजित साळवे, आदर्श साळवे, मिलिंद साळवे, छबू गायकवाड, सूर्यकांत सदाफुले, राजू साठे, सुभाष राजगुरू, अशोक साठे, विजय पुलावळे आदी बहुसंख्येने रीपाई कार्यकर्ते उपस्थित होते.